उस्मानाबाद जनता बँकेच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान, उद्या मतमोजणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उस्मानाबाद जनता बँकेच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान, उद्या मतमोजणी

उस्मानाबाद जनता बँकेच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान, उद्या मतमोजणी

sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद : उस्मानाबाद जनता बँकेच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान झाले असून उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. आता बँकेच्या चाव्या कोणाच्या हातात जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून शनिवारी (ता. २०) मतमोजणी होणार आहे. २० वर्षानंतर ही निवडणूक झाली असून याला पक्षीय पातळीवर पाठिंबा मिळाल्याने निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.

हेही वाचा: 'शेतकरी- मजुरांच्या विरोधात रचलेलं षडयंत्र हरलंय'

उस्मानाबाद जनता बँकेच्या १४ संचालकांच्या जागेसाठी शुक्रवारी (ता. १८) शांततेत मतदान झाले. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी प्रत्येक १५४ केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी आठ वाजता मतदानाला सुरूवात झाली. पहिल्या सत्रात मतदानाचा वेग कमी होता. १० वाजताच्या सुमारास मतदानाचा वेग पुन्हा वाढला. एका मतदाराला मतदान करण्यासाठी किमान एक ते दोन मिनिटांचा वेळ लागत होता. तर अनेक मतदान केंद्रावर रांगाही पाहायला मिळाल्या. मतदारांनी मोठ्या हिरहिरीने मतदान केले. बँकेचे एकूण ६७ हजार ८२१ मतदार आहेत. या निवडणुकीसाठी ७० ते ८० टक्के मतदान होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. चार वाजेपर्यंत साधारण ६० टक्केपर्यंत मतदान झाल्याचे काही मतदान केंद्रावर दिसून येत होते.

हेही वाचा: काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस', कार्यक्रमांचं आयोजन

२० वर्षानंतर मतदान

गेली अनेक वर्षे या बँकेवर ब्रिजलाल मोदानी आणि वसंतराव नागदे यांच्या (नागदे-मोदानी) गटाचे वर्चस्व आहे. त्यामुळे गेली २० वर्षे या बँकेची निवडणूक बिनविरोध झाली. दरम्यान यंदा मात्र बँकेच्या या निवडणुकीला पक्षीय रंग चढला. भाजपच्या गटाने पॅनल उभे केले. त्यामुळे सत्ताधारी गटालाही प्रत्येक मतदारापर्यंत पोहचावे लागले. त्यामुळे निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली होती. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. दरम्यान शुक्रवारी पाच वाजता सर्वच उमेदवारांचे भवितव्य मतपेठीत बंद झाले आहे.

बँकेच्या चाव्या कोणाच्या ताब्यात

शहरातील छायादिप मंगल कार्यालयात शनिवारी (ता. २०) सकाळी मतमोजणी होणार आहे. ५० टेबलवर ही मतमोजणी होणार असून सायंकाळपर्यंत निकाल हाती येईल, अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान तब्बल २० वर्षानंतर रंगलेल्या या निवडणुकीत मतदार बँकेच्या चाव्या कोणाच्या ताब्यात देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

loading image
go to top