उस्मानाबाद-कळंबचे आ. कैलास घाडगे पाटील यांना कोरोनाची लागण

आ. पाटील.jpg
आ. पाटील.jpg
उस्मानाबाद : उस्मानाबाद कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांना कोरोनाची लागण झाली असुन (ता.११) काही वेळापुर्वीच त्यानी तशी माहिती त्यांच्या फेसबुक अंकाऊटवर दिली आहे. अधिवेशनाच्या अगोदरची टेस्ट निगेटिव्ह आल्याने ते अधिवेशनासाठी हजर राहिले होते, मात्र त्यानंतर काही लक्षणे जाणवत असल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यानी पुन्हा गुरुवारी (ता. दहा) स्वॅब देऊन खात्री करण्याचा विचार केला, या स्वॅब चाचणीचा अहवाल शुक्रवारी सकाळी त्यांना प्राप्त झाल्यानंतर तो अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती आमदार घाडगे पाटील यानी दिली आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
त्याना कोरोनाची लागण नेमकी कधी झाली हा प्रश्न निर्माण होत असून अधिवेशनाच्या अगोदर पाच सप्टेंबरला त्यानी चाचणी केल्यानंतर तो अहवाल निगेटिव्ह तर चारच दिवसानंतरच्या चाचणीमध्ये अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मुंबईमध्येच त्यांना कोरोनाची लागन झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. अधिवेशनानंतरही मतदारसंघाच्या विविध कामासाठी ते मुंबईमध्येच थांबले होते,या दरम्यानच्या काळात ते एक दोन वेळा मंत्रालयातही गेले होते. कोरोनाचा प्रसार होत असताना कायम त्यानी गावभेटी देऊन तेथील यंत्रणेला कामाला लावले होते. जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित होणारे हे तिसरे आमदार आहेत. यापुर्वी उमरगा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले व विधानपरिषद सदस्य सुजीतसिंह ठाकुर हे पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्यावर उपचार होऊन ते पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसुन आले आहे. 

आ. घाडगे पाटील यांनी फेसबुक अकाऊंटवर लिहिलेली पोस्ट -      
नमस्कार, आजच काही वेळापुर्वी माझा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अधिवेशनाच्या अगोदरही मी टेस्ट केली होती, त्यावेळी अहवाल निगेटिव्ह आला असल्याने मी अधिवेशनात सहभागी झालो होतो.पण काल पुन्हा टेस्ट केली होती, अहवाल आताच प्राप्त झाला असुन त्यामध्ये मी पॉझिटिव्ह आलो आहे. त्यामुळे मागील आठ ते दहा दिवसापुर्वी माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकांनी काळजी घ्यावी व लक्षणे आढळुन येत असल्यास तातडीने टेस्ट करुन घ्यावी असे मी अवाहन करतो. माझी प्रकृती ठिक असुन काळजीचे कोणतेही कारण नाही. लवकरच उपचार घेऊन मी पुन्हा तुमच्या सेवेसाठी तयार असेन असा विश्वास व्यक्त करतो.

Edit- Pratap Awachatr

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com