esakal | उस्मानाबादेत तरुणाचा खून, सहा जणांवर गुन्हा दाखल  
sakal

बोलून बातमी शोधा

crime.png
  • महिलेसमोर लघुशंका केली होती म्हणून झाला होता खून. 
  • बुकनवाडी (ता. उस्मानाबाद) येथील घटना मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांचा विरोध.

उस्मानाबादेत तरुणाचा खून, सहा जणांवर गुन्हा दाखल  

sakal_logo
By
सयाजी शेळके

तेर (उस्मानाबाद) : उस्मानाबाद तालूक्यातील बुकनवाडी येथील सुरेश अरुण काळे (२०) या तरुणाचा खून केल्या केल्याप्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या समोर लघुशंका केल्याच्या कारणावरून बुधवारी बुकनवाडी शिवारात हा प्रकार घडला होता. 

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

रुक्मिनी अरुण काळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुरेश काळे यांना बुकनवाडी शिवारातील गायरान शेतात आरोपीनी लाथा बुक्यांनी मारहाण केली. गळा आवळून खून केला व प्रेत झाडाला लटकवले. यावरून बालाजी छगन वाकुरे, पांडुरंग छगन वाकुरे, पोपट छगन वाकुरे, योगेश अरूण वाकुरे, समाधान हरीभाऊ वाकुरे, अंकुश इंद्रजित बुकन यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास कळंब येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश पाटील करीत आहेत. 

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

दरम्यान घटना घडल्यानंतर २४ तास उलटले तरी या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. गुन्हा दाखल होत नसल्याने ग्रामीण रुग्णालयात तणाव वाढत गेला होता. जोपर्यंत आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास मयत तरुणांच्या नातेवाईकांनी नकार दिल्याने गुरुवारी (ता.२०) रोजी सायंकाळी सहापर्यंत मृतदेह ग्रामीण रूग्णालयातील शवविच्छेदन कक्षात पडून होता. अखेर गुरुवारी रात्री उशिरा सहा आरोपींच्या विरोधात ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश 
(संपादन-प्रताप अवचार)

loading image
go to top