Osmanabad : पन्नास हजारांची लाच घेणाऱ्या मुख्याध्यापकासह शिक्षकास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bribe crime
Osmanabad : पन्नास हजारांची लाच घेणाऱ्या मुख्याध्यापकासह शिक्षकास अटक

Osmanabad : पन्नास हजारांची लाच घेणाऱ्या मुख्याध्यापकासह शिक्षकास अटक

उस्मानाबाद : पन्नास हजार रुपयांची लाच मागणी करून लाच स्विकारल्याने मुख्याध्यापकासह सहशिक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (Anti Corruption Bureau) अटक करण्यात आली आहे. तक्रारदार हे शिक्षक असून यांचे वरिष्ठ वेतन मिळवून देण्यासाठी आणि शाळेचे इमारत बांधकामासाठी पाडोळी येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेन्द्र धोंडीबा सूर्यवंशी (वय ४५) यांनी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपये लाच रकमेची (Osmanabad) मागणी करून आरोपी अमोल नागनाथ गुंड (वय ४१), सहशिक्षक, डॉ. बाबासाहेब यांच्यामार्फत लाच स्वीकारली. तसेच व्यंकट विश्वनाथराव गुंड, संस्थापक अध्यक्ष, जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ, पाडोळी प्रोत्साहन दिल्याने आणि तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नव्हती. (Osmanabad News Head Master Along With Teacher Arrested For Bribe)

हेही वाचा: Beed : धक्कदायक ! गर्भवती पत्नीसह पतीची फाशी घेऊन आत्महत्या

त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क साधून तक्रार दिली. गुरुवारी (ता.१६) पाडोळी येथील शाळेत सापळा लावण्यात आला. याबाबत बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गौरीशंकर पाबळे , उस्मानाबाद यांनी केली. या कामी त्यांना पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विष्णू बेळे, चालक दत्तात्रय करडे यांनी मदत केली.

Web Title: Osmanabad News Head Master Along With Teacher Arrested For Bribe

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Osmanabad