esakal | पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याच शोध सुरुच
sakal

बोलून बातमी शोधा

drown

पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याच शोध सुरुच

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : उस्मानाबाद Osmanabad तालुक्यात शुक्रवारी (ता.नऊ) झालेल्या मुसळधार पावसामुळे Rain नदी-नाले भरून वाहिल्याने तालुक्यातील बोरगाव आणि समुद्रवाणी येथे प्रत्येकी एक याप्रमाणे दोन व्यक्ती वाहून गेले होते. त्यांचा शोध घेण्याचे शुक्रवारी रात्रीपासून यंत्रणांच्या मदतीने सुरू होते. दोघांपैकी एकाचा मृतदेह रविवारी (ता.११) सापडला आहे, तर दुसऱ्याचा अजुनही शोध सुरुच आहे. उस्मानाबाद तालुक्यातील बोरगाव राजे- बोरखेडा रस्त्यावरील ओढ्यातून बोरखेडा येथील ओढ्यावरील पुलावरून जाताना समीर युन्नूस शेख ( वय २७) हे वाहून गेले होते. श्री.शेख हे मोटरसायकलवर होते. एका शेतकऱ्याने त्यांना पाण्यात जाण्यास मनाई करूनही ते वाहत्या पाण्यात गेले.osmanabad news youth dead body found, other still missing

हेही वाचा: Aurangabad : औरंगाबादेत रिमझिम सरी, मुसळधार पावसाची शक्यता

पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की, काही क्षणातच ते त्या प्रवाहाबरोबर वाहून गेले. गावकऱ्यांच्या मदतीने त्याचा शोध घेण्याचे कार्य सुरू होते. शनिवारी (ता.दहा) रात्रीपर्यंत त्यांना शोध लागला नाही. पोलिस, महसूल, नगर परिषद आणि उस्मानाबाद फायर ब्रिगेडची टीम पाठवण्यात आली होती. रविवारी सकाळी शेख यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला आहे. तसेच दुसर्‍या घटनेत समुद्रवाणी गावातील पुलावरून एक कार पाण्यात वाहून गेली. या कारमध्ये चौघे जण होते.

हेही वाचा: Nanded : नांदेडला भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

त्यापैकी दोघे पाण्याचा अंदाज घेण्यासाठी उतरले होते, तर दोघे कारमध्ये होते. वाहून जाणाऱ्या कारमधील मेढा येथील गोवर्धन विष्णू ढोरमारे (वय ५५) आणि बाबा विश्वनाथ कांबळे या दोघांना गावकऱ्यांच्या मदतीने सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात यश आले आहे. दरम्यान, समुद्रवाणी येथे पूर पाहण्यास गेलेला एक व्यक्ती पुरात वाहून गेला आहे. तो अद्याप सापडलेला नाही. त्यांचाही शोध घेण्याचे कार्य सुरू आहे.

loading image