उस्मानाबाद पोलीस दलात २७९ जणांच्या बदल्या, 'कही खुशी,कही गम' चे वातावरण !      

तानाजी जाधवर
Thursday, 1 October 2020

उस्मानाबाद पोलीस दलातील कर्मचार्यांची नुकतीच बदल्यांची यादी जाहीर झाली आहे. यात कही खुशी कही गम असे वातावरण निर्माण झाले आहे. तर काही अधिकार्यांना आहे त्याच जागेवर मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे सगळीकडे नाराजीचा सुर निर्माण झाला.

उस्मानाबाद : जिल्ह्यातील पोलीस दलातील २७९ जणांच्या बदल्यांची यादी जाहीर झाली आहे. पोलीस अधिक्षक राजतिलक रौशन यांनी कर्मचाऱ्यांच्या पसंतीनुसार या बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यादीत साधारण ६० कर्मचार्यांना आहे त्याच ठिकाणी मुदतवाढ दिल्याने त्याबद्दल पोलीस दलात दबक्या सुरात उलटसुलट प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या आहेत. मर्जीतील कर्मचार्यांना बदल्यांचा लाभ झाल्याची चर्चा पोलीस दलामध्ये सुरु झाली आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

जिल्ह्यात ३० सप्टेंबर रोजी बदल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. शासनाने ३० तारखेपर्यंत जिल्ह्यांतर्गत बदल्याचा निर्णय घ्यावा असे आदेशित केले होते. त्यानंतर ही प्रक्रिया १५ सप्टेंबर पर्यंत करण्याचाही आदेश आला होता. तरीही पोलीस अधिक्षक श्री. रौशन यांनी अत्यंत चांगल्या पध्दतीने प्रक्रिया राबविल्याचे दिसुन येत आहे. कर्मचाऱ्यांना हवे असलेल्या ठिकाणाला पसंती देण्याचा चांगला निर्णय पोलीस अधिक्षकांनी घेतला त्यामुळे कर्मचारी अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया देताना दिसत आहे. असे असले तरही एवढ्या मोठ्या दलाचा डोलारा सांभाळताना कुठेतरी टिका-आक्षेप घेतले जातातच. असाच काहीसा प्रकार या बदली प्रक्रियेतही पाहायला मिळत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्यांना मुदतवाढ 
मर्जीतील अधिकारी व त्यांचे कर्मचारी यांना अधिकच सुट दिल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाल्याचे पोलीस कर्मचारी दबक्या आवाजात बोलताना दिसत आहेत. अशा कर्मचाऱ्यांना बदलीनंतरही ठिकाण बदलून दिलेले नाही. त्याना आहे त्याच ठिकाणावर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यातही स्थानिक गुन्हे शाखेच्या लोकांनाही मुदतवाढ दिल्याचे दिसुन येत आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कर्मचाऱ्यांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेमध्ये जाण्यासाठी मोठी चढाओढ असते. आहे त्याच लोकांना मुदतवाढ दिल्याने काही प्रमाणात नाराजीसुद्धा पाहायला मिळत आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह अन्य ठिकाणीही मुदतवाढ देण्यात आल्याचे प्रकार पाहायला मिळत आहे. जवळपास ६० कर्मचाऱ्यांना अशा नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. बदल्याचा हेतुच कर्मचारी एका ठिकाणी अनेक दिवस ठाण मांडून बसु नये हा असतो. मुदतवाढीने अशा हेतूचा सोयीस्कर विसर पडल्याची चर्चा पोलीस दलामध्ये दिसुन येत आहे.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad police force 279 transferred