Osmanabad Rain News
Osmanabad Rain Newsesakal

Osmanabad Rain| लोहारा, तुळजापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस; पिकांचे मोठे नुकसान

अचानक आलेल्या पावसामुळे शिवारात फळबागासह काढणीला आलेला गहू, ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे.
Published on

जेवळी/ तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : जेवळी (ता.लोहारा) परिसरात रविवारी (ता.दहा) सायंकाळी साडेपाच-पाच या काळात वीस ते पंचवीस मिनिटे वादळी वारा, मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. यावेळी काही काळ गारपीटही (Hailstorm) झाली. अचानक आलेल्या पावसाने शिवारात फळबागासह काढणीला आलेल्या गहू, ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे. जेवळी व परिसरात गेल्या चार- पाच दिवसांपासून दुपारी कडक ऊन, तर संध्याकाळी ढगाळ वातावरण आहे. रविवारी सायंकाळी मात्र साडेपाच या काळात अचानक वादळी वारा, मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. या वीस ते पंचवीस मिनिटे झालेल्या जोरदार पावसात (Rain) शिवारात फळपिकांचे तसेच काढणीला आलेल्या व राशी होत असलेल्या गहू, ज्वारी आणि करडाई या पिकांचे नुकसान झाले आहे. (Osmanabad Rain Updates Untimely Rain Damages Crops In Lohara And Tuljapur Taluka)

Osmanabad Rain News
Aurangabad| किर्तनकार 'बाबाचा अश्लील व्हिडिओ' व्हायरल, वारकरी संप्रदाय आक्रमक

यावेळी काही मिनिटे गारपीट ही झाली आहे. यात शिवारात आंबा गळती झाली असून काही ठिकाणी झाडे उन्मळून पडले आहेत. नव्याने रचलेल्या कडब्याच्या गंजी वार्‍यामुळे विस्कळीत झाल्या आहेत. या वेळी वाऱ्याचा वेग व मेघगर्जमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होत आहेत.

Osmanabad Rain News
मोदींनी राशन दिलं, पण फडणवीस साहेब ते शिजवायचे की कच्चे खायचे?: उद्धव ठाकरे

तुळजापुरमध्येही पाऊस

तुळजापूर (Tuljapur) शहरासह अपसिंगा, कांक्रबा, सिंदफळ तसेच शहरापासून जवळच असणाऱ्या धारूर येथे रविवारी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. शहरातील काही भागातील विद्युत पुरवठा सायंकाळी पाच वाजल्यापासून खंडित झाला होता. अपसिंगा (ता.तुळजापूर) येथे पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तसेच उस्मानाबाद (Osmanabad) तालुक्यातील धारूर येथे गाराचा पाऊस झाला. धारूर येथे मोठ्या प्रमाणावर गारा पडल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com