esakal | ‘ते’ मजूर कन्या प्रशालेतील विलगीकरण केंद्रात
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

बार्शी येथून आणलेल्या ३२ मजुरांना घेउन जाणारा टेंपो हादगावकडे (जि. नांदेड) जात होता. मात्र कळंब शहरात तैनात चोख बंदोबस्त पाहून चौकात मजुरांना सोडून देत केले चालकाने पलायन केले. 

‘ते’ मजूर कन्या प्रशालेतील विलगीकरण केंद्रात

sakal_logo
By
दिलीप गंभिरे

कळंब (जि. उस्मानाबाद) : एका टेंपोतून आणलेल्या नांदेड जिल्ह्यातील हादगाव येथील ३२ मजुरांना टेम्पोचालकाने येथील रंगीला चौकात सोडून पलायन केल्याचा खळबळजनक प्रकार शुक्रवारी (ता. तीन) सकाळी सातच्या सुमारास घडला आहे. दरम्यान, या मजुरांना बार्शी येथून आणल्याचा प्रकार समोर येत आहे. या मजुरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना जिल्हा परिषद कन्या शाळेतील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. 

जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळून आल्याने कळंब तालुक्यातील नागरिक ॲलर्ट झाल्याचे पाहावयास मिळत आहे. कोरोना विषाणू संसर्ग पसरतो की काय या भीतीने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच नांदेड जिल्ह्यातील हादगाव येथील ३२ मजूर शहरात दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या मजुरांना घेऊन एक टेंपो शहरात आला होता.

इकडे आईचं सरण पेटलं आणि तिकडे...

संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याची चाहूल लागताच टेंपोचालकाने शहरातील तांदुळवाडी रस्त्यावर रंगीला चौकात सर्व मजुरांना सोडून देत पलायन केले. नागरिकांनी या मजुराला हटकले असता बार्शीहून नांदेड जिल्ह्यातील हादगावकडे जाणार होतो, असे त्यांनी सांगितले. माहिती मिळताच पोलिसांनी या सर्वांना जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेतील विलगीकरण कक्षात दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी या सर्वांची तपासणी केली. 

लहान मुलांचा समावेश 
दरम्यान, हादगाव येथून ३२ जण हे मजुरीसाठी गेले होते. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे मजुरी करीत बाहेरच्या जिल्ह्यांत गेलेल्या नागरिकांना गावाकडे जाण्याची ओढ लागली आहे. मिळेल त्या वाहनाने पोलिस अडवीत नाहीत तिथपर्यंत प्रवास करीत आहेत. सीमाबंदी असल्यामुळे पोलिस वाहनांची कसून चौकशी करीत आहेत. त्यामुळे मजुरांचा गावाकडे जाण्याचा मार्ग बंद होत आहे. या ३२ मजूर कुटुंबांत लहान मुलांची मोठी संख्या असल्याचे दिसून येत आहे. 

महसूल प्रशासनाकडून केली जाते सोय 
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेत जालना जिल्ह्यातील सेवती गावातील २० मजुरांचा मुक्काम याच केंद्रात आहे. आता नांदेड जिल्ह्यातील हादगाव येथील ३२ मजुरांचा मुक्कामही याच केंद्रात असून सर्वांच्या भोजनाची सोय महसूल प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 

loading image