कधी होणार उस्मानाबाद जि.प. अध्यक्षांची निवड : वाचा

तानाजी जाधवर
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

भाजपचे चार, काँग्रेसचे तेरा त्यातील एक सेनेकडे आले आहेत. पक्षीय व गटाच्या संख्येचा विचार केला तर माजी आमदार राहुल मोटे यांच्याशिवाय सत्तेपर्यंत जाता येण सध्या तरी शक्य दिसत नाही.

उस्मानाबाद : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला असुन, येत्या आठ जानेवारीला ही निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये राजकारण चांगलच ढवळुन निघणार असे चित्र आहे.
 
सध्या नेताजी पाटील हे अध्यक्ष व उपाध्यक्ष अर्चना पाटील या आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या गटाकडे ही सत्ता आहे. सध्या आमदार श्री. पाटील भाजपामध्ये आहेत, तर त्यांनी त्यांचा गट राष्ट्रवादीतच ठेवल्याचे दिसुन येत आहे.

हेही वाचा - कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही

माजी आमदार राहुल मोटे पक्षाच्या बरोबर जाणार की, आमदार पाटील यांच्या गटासोबत हे अजुनही गुलदस्त्यात आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने स्थानिक पातळीवर हे समीकरण जुळविण्यासाठी अजुनही कोणी पुढे आल्याचे दिसुन येत नाही. त्यातही काँग्रेसचा एक बडा नेता सध्या आमदार पाटील यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.

राणाजगजितसिंह पाटील यांची बाजु भक्कम

त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्ता समीकरणात सध्या तरी राणाजगजितसिंह पाटील यांची बाजु भक्कम दिसत आहे. त्याला छेद देण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रा. तानाजी सावंत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील हे कोणती चाल खेळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यानी अजुन कोणतेही पत्ते उघड केलेले नाहीत.

भाजपाच्या चिन्हावर निवडुन आलेल्या चार सदस्यांचे बळ भाजपाचे आमदार श्री. पाटील यांनाच मिळणार आहे. त्यांच्या गटाकडुन अस्मिता शिवदास कांबळे यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. उपाध्यक्ष पदासाठी पुन्हा अर्चना पाटील यांचेच नाव पुढे केले जाईल असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा-

महाविकास आघाडीकडे अध्यक्ष पदासाठी कोणाचे नाव पुढे करायचे याबाबतच संभ्रम निर्माण झाल्याचे दिसुन येत आहे. त्यांच्या आघाडीकडे नेत्यांची संख्या अधिक असल्याने पदाच्या वाटपात नेत्यांची चांगलीच कसरत होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला सत्तेत जाण्यासाठी हा मोठा अडथळा दिसुन येत आहे.

पक्षीय बलाबल पाहिले तर...

सध्या पक्षीय बलाबल पाहिले तर आमदार पाटील समर्थकाची संख्या सर्वाधिक म्हणजे 17 तर श्री. मोटे यांच्याकडे सहा, राष्ट्रवादीकडे तीन, शिवसेनेकडे अकरा सदस्य असले तरी त्यातील दोन अगोदरच बंडखोरी करुन सत्तेत सहभागी झालेले आहेत. तर एक सदस्य रिक्त व सुरेश कांबळे यांची पक्षातुन हकालपट्टी झाल्याने त्यांच्या भावजय देखील पक्षापासुन दुर गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे सात सदस्य सेनेकडे आहेत.

हेही वाचा - फटाका तोंडात फोडला...अन असे घडले...

भाजपचे चार, काँग्रेसचे तेरा त्यातील एक सेनेकडे आले आहेत. पक्षीय व गटाच्या संख्येचा विचार केला तर माजी आमदार राहुल मोटे यांच्याशिवाय सत्तेपर्यंत जाता येण सध्या तरी शक्य दिसत नाही.

हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad Zila Parishad Election Program Declared Marathi News