esakal | इथे पाहुण्यांच्या हातावर मारला जातोय होम क्वारंटाइनचा शिक्का
sakal

बोलून बातमी शोधा

Home Quarantine

जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यांतून आलेल्यांमुळेच कोरोनाचा शिरकाव झाला. यामुळे बाहेरच्या जिल्ह्यांतून येणाऱ्यांवर प्रशासन करडी नजर ठेवत आहे. बाहेरच्या जिल्ह्यांतून आलेल्यांना सक्तीने होम क्वारंटाइन करण्यात येत आहे. अशा लोकांचा घराबाहेरील वावर बंद करण्यासाठी त्यांच्या दोन्ही हातांवर होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात येणार आहे. यासाठी मतदानासाठी वापरली जाणारी शाई उपयोगात आणली जाणार आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गुरुवारी (ता. १६) हे आदेश दिले. 

इथे पाहुण्यांच्या हातावर मारला जातोय होम क्वारंटाइनचा शिक्का

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यांतून आलेल्यांमुळेच कोरोनाचा शिरकाव झाला. यामुळे बाहेरच्या जिल्ह्यांतून येणाऱ्यांवर प्रशासन करडी नजर ठेवत आहे. बाहेरच्या जिल्ह्यांतून आलेल्यांना सक्तीने होम क्वारंटाइन करण्यात येत आहे. अशा लोकांचा घराबाहेरील वावर बंद करण्यासाठी त्यांच्या दोन्ही हातांवर होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात येणार आहे. यासाठी मतदानासाठी वापरली जाणारी शाई उपयोगात आणली जाणार आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गुरुवारी (ता. १६) हे आदेश दिले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

कोरोनाला जिल्ह्याच्या बाहेरच रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरवातीपासून प्रभावी उपाययोजना केल्या. या उपाययोजनांना यश आले. मात्र, उस्मानाबाद जिल्ह्यातून आलेल्या परप्रांतीयांमुळे जिल्ह्यात चोरपावलांनी कोरोनाचा शिरकाव झाला. या घटनेपासून बाहेरच्या जिल्ह्यांतून येणाऱ्यांवर प्रशासनाने चांगलीच नजर ठेवली आहे. चोरपावलांनी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या लोकांना सीमेवरच रोखण्यात येत आहे. तरीही काहीजण गुपचूप येऊन जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यांच्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता वाढली आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मुळेच आता प्रशासनाने कठोर पाऊल उचलत जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्या सर्व नागरिकांना चौदा दिवस सक्तीने होम क्वारंटाइन केले आहे. मात्र, हे लोक बिनदिक्कत घराबाहेर पडून फिरत आहेत. या लोकांना घराबाहेर पडण्यापासून रोखण्याची गरज निर्माण झाली आहे. यामुळे अशा लोकांची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या दोन्ही हातांवर होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्याचे आदेश श्रीकांत यांनी दिले आहेत. यासाठी तातडीने शिक्के तयार करून गावपातळीवरील यंत्रणेला उपलब्ध करून द्यावेत आणि त्यासाठी लागणारी शाई निवडणूक विभागाकडून उपलब्ध करून घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

भाजीपाला विक्री दुकानातूनच 
काही दिवसांपूर्वी गल्लोगल्ली फिरून तसेच किराणा किंवा अधिकृत दुकानांतूनच दुपारी दोन वाजेपर्यंतच भाजीपाला विक्री करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, काही दिवसांत हातगाडे व वाहनांतून फिरून भाजीपाला विक्री करणाऱ्यांची संख्या वाढल्याने कोरोना संसर्गाची शक्यताही वाढली. यामुळे शहरात हातगाड्यांवरून फिरून भाजीपाला विक्रीस श्रीकांत यांनी मनाई केली असून आता अधिकृत दुकान व किराणा दुकानातूनच भाजीपाला विकण्यास मुभा दिली आहे. जवळच्या भाजीपाला व किराणा खरेदीसाठी दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर न करता पायी जाऊन खरेदी करण्याची सक्तीही श्रीकांत यांनी केली आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठीक्लिक करा

loading image