esakal | ऑक्सिजन टँकर उलटला; दोन तास वाहतूक ठप्प, औंढा- जिंतूर मार्गावरील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

औंढा नागनाथ रस्त्यावर ट्रक अपघात

ऑक्सिजन टँकर उलटला; दोन तास वाहतूक ठप्प, औंढा- जिंतूर मार्गावरील घटना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औंढा नागनाथ ( जिल्हा हिंगोली ) : तालुक्यातील धारमाथा पूर्णा नदीवरुन जाणाऱ्या औरंगाबाद- नांदेड राष्ट्रीय महामार्गावरुन हिंगोलीकडे ऑक्सिजन घेऊन जात असलेला टँकर उलटला. यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन लीक झाला. तब्बल दोन तासांच्या दुरुस्तीनंतर हे टँकर हिंगोलीकडे रवाना करण्यात आले. सुदैवाने यात काही जीवित हानी झाली नाही. ही घटना सोमवारी (ता. १४) सायंकाळी घडली. गॅस असल्याच्या अफवेने प्रवासी घाबरले होते.

औंढा नागनाथ तालुक्यातून औरंगाबाद नांदेड हा राष्ट्रीय महामार्ग जातो. पूर्णा नदीवरील पूल अरुंद असल्याने औरंगाबाद येथून हिंगोलीसाठी ऑक्सिजन टँकर घेऊन येणाऱ्या चालकाला त्याचा अंदाज आला नाही. अचानक नियंत्रण सुटल्याने 16 टायर टँकर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. ही घटना सायंकाळी घडली. चालक व इतर दोघांनी उड्या घेऊन जीव वाचविला. परंतु टँकरमधील ऑक्सिजन लीक झाला. प्रवाश्यांना गॅस असल्याची भीती वाटल्याने धावपळ झाली होती. परंतु वाहन चालकाने यात ऑक्सिजन असल्याची माहिती दिल्याने सर्वांना हायसे वाटले. दोन तासाच्या प्रयत्नानंतर गळती बंद झाली. यानंतर क्रेनच्या साहयाने उलटलेला टँकर सरळ करण्यात आला. परत हिंगोली येथे रवाना करण्यात आले.

हेही वाचा - वऱ्हाडाच्या टेम्पोला मुखेडजवळ भिषण अपघात: एक ठार तर ३१ जण जखमी

या बाबत तहसीलदार कृष्णा कानगुले, पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, सहायक पोलिस निरीक्षक मुंजाजी वाघमारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल लांडगे, पोलिस उप निरीक्षक गणेश राठोड यानी भेट दिली. अपघातानंतर रस्त्याचा दोन्ही बाजूनी वाहनांच्या रंगा लागल्या होत्या. दोन ते अडीच तास वाहतूक सुरळीत करण्यासाठी लागला.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image