
Paithan News: पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाने पंधरा -वीस वर्षापूर्वी 'पाणी अडवा - पाणी जिरवा' मोहीम राबवत पाणलोटसह विविध नद्यांवर कोल्हापुरी बधारे उभारुन बोअर, विहिरींच्या पाण्याचा स्त्रोत जिवंत ठेवण्याचा कसोशीने प्रत्यत्न केला.
परंतु अलिकडील पाच - सहा वर्षापूर्वी बंधारे आटल्याने या बंधाऱ्याच्या दरवाजाला पाय फुटले, तर कृषी विभाग, जिल्हा परिषदेचे सिंचन विभाग यांनी सिमेंट बंधाऱ्याच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष केल्याने पावसाचे जसे पाणी आले तसे वाहुन गेले.