esakal | बीड झेडपीत पंकजा मुंडेंनी गमावली सत्ता, राष्ट्रवादीचा विजय
sakal

बोलून बातमी शोधा

शिवकन्या सिरसाठ

माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील बीड जिल्हा परिषदेत सत्तेत असलेल्या भाजपने सत्ता गमावली आहे. मिनी मंत्रालय असलेल्या झेडपीचा कारभार आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष व उपाध्यक्ष सांभाळणार आहे. 

बीड झेडपीत पंकजा मुंडेंनी गमावली सत्ता, राष्ट्रवादीचा विजय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड - राज्यात बहुचर्चित बीड जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता उलटून टाकण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे. अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवकण्या सिरसाट, तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे, या निवडणुकीत भाजपचीही तीन मते फुटली. 

भाजपच्या ताब्यातील जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व कॉंग्रेस एकत्र आले. भाजपचीदेखील तीन मते फुटली. राष्ट्रवादीच्या शिवकन्या सिरसाट यांनी भाजपच्या डॉ. योगिनी थोरात यांचा पराभव केला.

हेही वाचाभाकरीचे पीठ संपले अन सुरेखाच्या आयुष्याचा दोरही तुटला! हृदयद्रावक...

तर, उपाध्यक्षपदासाठी बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या भारत काळे यांचा पराभव केला. श्रीमती सिरसाट व श्री. सोनवणे यांना प्रत्येकी 32 मते मिळाली. तर, डॉ. थोरात व श्री. काळे यांना प्रत्येकी 21 मते मिळाली. 

हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा-

तीन सभापती, तीन सदस्यांनी सोडली साथ 
निवडीत महत्त्वाची बाब म्हणजे भाजपसोबत मागच्या काळात सत्तेत असलेले तीन सभापती या वेळी राष्ट्रवादीसोबत गेले. यात भाजपच्याच सभापती शोभा दरेकर, कॉंग्रेसचे सभापती राजेसाहेब दरेकर, शिवसेनेचे सभापती युद्धाजित पंडित या तीन सभापतींनी या वेळी महाविकास आघाडीची साथ दिली तसेच भाजपचे तीन जिल्हा परिषद सदस्यदेखील फुटले.