परभणी : घरट्यांपासून दुरावलेल्या पक्ष्यांच्या पिलांचे पालकत्व स्वीकारले पक्षीमित्रांनी

file photo
file photo

परभणी : हिंगोली शहरातील एका महाविद्यालयात स्वच्छतेच्या नावाखाली घर पोकळी या पक्षाची संपूर्ण घरटी तोडून टाकण्यात आली. या पक्षाचे तब्बल 36 पिल्ले या ठिकाणी होते. या पिलांना उडता देखील येत नव्हते. अखेर घरटं गमावलेल्या या पिलांचे जिंतूर (जि. परभणी) येथील पक्षीमित्रांनी पालकत्व स्विकारले. दुर्देवाने यातील सात पिलांनी घरटे सोडले की स्वत:चा जीव ही सोडला. सध्या 29 पिलं जिंतूरात तीन पक्षीमित्रांच्या पालकत्वाखाली आहेत.

हिंगोली मध्ये ता. १६ ऑक्टोबर रोजी एका महाविद्यालयात स्वच्छतेच्या नावाखाली घर पाकोळी या पक्ष्यांची संपूर्ण घरटे तोडून टाकण्यात आले. या घरट्यात पिलं असल्याने महाविद्यालायतील लोकांनी स्थानिक सर्पमित्रांसी संपर्क करून ती पिल्ले सर्पमित्रांच्या स्वाधीन केले. या सर्पमित्रांना पक्ष्यांविषयी जास्त माहिती नसल्याने त्यांनी जिंतूर मधील पक्षीमित्र गणेश कुरा यांना संपर्क करून घडलेली सर्व माहिती दिली. 

पक्ष्यांच्या पिलांची संपूर्ण काळजी घेत देखभाल सुरु

श्री. कुरा यांनी तातडीने ती सर्व पिल्ले जिंतूरपर्यंत पाठवून द्या असे सांगितले. सर्पमित्रांनी ते पिल्ले काळजीपूर्वक जिंतूरला आणली. बॉक्समध्ये घर पाकोळीचे २९ पिल्ले होते. सात पिल्यांनी घटनास्थळीच आपला जीव सोडला होता. एकोणतीस पिलांना जगवण्याची जबाबदारी आता तीन गणेश कुरा, अनिल उरटवाड व माणिक पुरी यांच्यावर आली. या तिघांनी देखील या पक्ष्यांच्या पिलांची संपूर्ण काळजी घेत देखभाल सुरु केली आहे.

पिलांच्या जेवणाचे काय ?

पक्षी प्रामुख्याने हवेत उडत असणारे कीटक खात असतो. याची शिकार करण्याची पद्धत जरा वेगळीच. घर पाकोळी शिकार करतांना आपलं तोंड उघड ठेऊन उडत असते. उडते कीटक तोंडात येत असतात. गळ्यात शिकार साठवून ठेऊन शिकार झाल्यानंतर एक एक करून घर पाकोळी आपल्या पिलांना भरवत असते. किडे भरावनं हे किती अवघड काम आहे ते किडे पकडते वेळी पक्षीमित्रांच्या लक्षात आले. पकडून आणलेले किडे हे पक्षी खातील का नाही? हा प्रश्न ही त्यांना पडला होता. परंतू पिलांनी किडे खाण्यास प्रतिसाद दिला.

किडे पकड्यासाठी दररोज तीन किलोमिटरचा प्रवास

पिल्लांना जगण्याची आणि जगवण्याची पक्षीमित्रांची इच्छा आत्ता प्रबळ झाली होती. रोज किडे पकडण्यासाठी रानोमाळ दोन ते तीन किलोमीटर भटकणे, कडलेले किडे बॉटल मध्ये टाकणे हा त्यांचा आता नित्यक्रम झाला आहे. सध्या अनिल उरटवाड यांच्याकडे नऊ, गणेश कुरा व माणिक पुरी यांच्याकडे प्रत्येकी 10 पिलांची जबाबदारी देण्यात आली आहे.

आम्ही पिलांची काळजी घेत आहोत

किडे पकडत असतांना एका वेळेला वाटायचं एक जीव वाचवायचा आणि दुसरा घ्यायचा.हे मनाला कुठं तरी पटत नव्हतं .शेवटी पक्षीमित्र म्हणल्यानंतर जड अंतकरणाने ते करावंच लागतं आणि ते आम्ही खूप आनंदाने केलं. पक्षाच्या पिलांना विभागून आम्ही पिलांची काळजी घेत आहोत. रोज सकाळी किंवा संध्याकाळी माळरानावर जाऊन पिल्लांसाठी किडे पकडणे हा गेली चार दिवस नित्यक्रम झाला आहे.

- अनिल उरटवाड,पक्षीमित्र

संपादन - प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com