तुम्ही हेलिकॉप्टर पालक आहात की मिलिटरी मॅन पालक? पहा वाचून -

Aurangabad news
Aurangabad news

औरंगाबाद : प्रचंड काम आणि तणावपूर्ण जीवनशैलीत आज पालकांकडे पाल्यासाठी वेळच नाही. त्यामुळे बच्चेकंपनीचे बालपण हरवत आहे. त्यांना पालकांच्या घाईने मोठे व्हावे लागत आहे, असे मत प्रसिद्ध मानसशात्रज्ञ गरिमा आचलिया यांनी रविवारी (ता.22) महिला सीएच्या कार्यशाळेत व्यक्त केले. 

औरंगाबाद सीए संघटनेच्या वतीने दोनदिवसीय महिला सीए परिषदेत "मुलांचे संगोपन आणि पालकत्व' या विषयावर मानसशास्त्रज्ञ गरिमा आचलिया यांनी मार्गदर्शन केले. पालकांच्या जिद्दी आणि हट्टी स्वभावाची शास्त्रीय पद्धतीने मांडलेली वैशिष्ट्ये सांगितली.  

गरिमा म्हणाल्या, की आज मुलांना पालक भीतीपोटी अति सुरक्षित ठेवत आहेत. कोणतेही काम असेल तर आई किंवा वडील सतत त्यांच्या भोवती भिरभिरत असतात. काहीही अडचण आली तर" मी आहे ना' असे म्हणत मुलांचे भांडण सोडवणे, शिक्षक रागावले तर त्याचा जाब विचारणे. अशी कामे ते सतत मुलांसाठी करतात. अशा पालकांना हेलिकॉप्टर पालक असे नाव आहे.

या वृत्तीने मुलांना त्याचे निर्णय घेता येत नाहीत आणि पुढे तेच आई-बाबांचे न ऐकता आपल्याबरोबरच्या मित्रांनाचे ऐकतात. पुढे दारू, सिगारेट, ड्रगच्या आहारी जाण्याची शक्‍यता जास्त असते. काही पालक मुलांना फक्त ऑर्डर देतात हे करू नका, ते करू नका अशी दहशत असते. अशा पालकांना आम्ही मिलिटरी मॅन पालक म्हणतो. तर काही पालक समुपदेशकाची भूमिका निभावतात.

मुलांना ठराविक वेळेतच मोबाईल द्या.. 

हल्ली मुलांना मोबाईलपासून दूर कसे ठेवावे हा मोठा प्रश्न पालकांसमोर आहे. मुलं जर सहा ते आठ तास मोबाईलवर खेळत असेल तर डॉक्‍टरला दाखवण्याची गरज आहे असे समजा. कारण अति मोबाईलचा वापर घातक आहे. त्यासाठी काही वेळा ठरवूनच मुलांना मोबाईल द्या. रात्री नऊनंतर सर्व गॅजेट्‌स एका कपाटात ठेवून देण्याची सवय लावा. 

पालकांसाठी टिप्स.. 

  • मुलांचे कौतुक करा, त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्या 
  • चूक झाली तर माफ करून ती दुरुस्त करायला शिकवा 
  • ओरडणे, ऑर्डर देण्यापेक्षा त्यांना पर्याय द्या
  • रोज अशी वीस मिनिटे द्या, ज्यावेळी ते तुमचे फक्त मित्र असतील 
  • आय लव्ह यू, तू मला खूप आवडते अशी वाक्‍ये मुलांसाठी वापरा 

यावेळी औरंगाबाद सीए शाखेचे अध्यक्ष सीए रोहन आचलिया, रूपाली बोथरा, सीए गणेश भालेराव, सीए सपना लुनावत, सीए ऐश्वर्या ब्रह्मेच्या यांच्यासह डॉ. मनसुख आचलिया, डॉ. रश्‍मीन आचलिया यांची प्रमुख उपस्थिती होती. पहिल्या सत्रात टॅलीमधील "सात सीक्रेट' यावर सीए रजत मुळे यांनी विचार मांडले. तर दुपारी तीन ते सहा या वेळेत किरण वाधवाणी यांनी "बालपणीचे खेळ' घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com