उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची धावपळ, दोन दिवसांत एकही अर्ज नाही

प्रविण फुटके
Friday, 25 December 2020

तालुक्यातील सात ग्रामपंचायतचा  निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे

परळी वैजनाथ (जि.बीड) : तालुक्यातील सात ग्रामपंचायतचा  निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. मागील दोन दिवसात एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. पुढील तीन दिवस सुट्या आल्याने फाँर्म भरण्यासाठी तीनच दिवस शिल्लक आहेत.

तालुक्यातील सात ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपल्याने निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. बुधवार (ता.२३) पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पण दोन दिवसांमध्ये यात ग्रामपंचायत मध्ये एकही उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत. इच्छुक उमेदवार कागदपत्रे जमा करण्यासाठी पळापळ करताना दिसून येत आहेत. तसेच घोषित झालेले सरपंचपदाचे आरक्षण रद्द झाल्याने इच्छुक उमेदवारांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

धक्कादायक! कोरोनावर मात केलेल्या महिलेच्या शरीरात झाला पस; जगातील सातवी, तर भारतातील पहिलीच केस

दरम्यान आता मतदानानंतर आरक्षण काढण्यात येणार असल्याने इच्छुकामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. निवडणूक घोषित झालेल्या ग्रामपंचायत मध्ये मोहा ग्रामपंचायत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, गर्देवाडी, सरफराजपूर मागास प्रवर्ग पुरुष, भोपळा अनुसूचित जाती पुरुष, रेवली, वंजारवाडी सर्वसाधारण महिला, लाडझरी सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडल्याने निवडणूकीची जोरदार तयारी करण्यात येत होती.पण आरक्षण रद्द करण्यात आल्याने सर्वांचा हिरमोड झाला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत मंत्री भुमरेंना मामाच्या मुलांचच आव्हान

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी येथील प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी केली असून अर्ज स्विकारण्यासाठी चार टेबल आहेत. यासाठी ९ कर्मचारी, ५ निवडणूक अधिकारी आहेत.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: parli gram panchayat election political news marathvada