esakal | दोन वर्षांपासून परळीतील विद्यार्थी का आहेत शिष्यवृत्तीपासून वंचित 
sakal

बोलून बातमी शोधा

0000Scholarship_2_12.jpg
  • आधार लिंकमुळे हजारो विद्यार्थ्यांची हेळसांड. 
  • शिष्यवृत्ती पाहिजे असेल तर पोष्ट आँफीसमध्ये खाते उघडावे लागेल. काही विद्यार्थी पोष्ट आँफीस मध्ये खाते उघडण्यासाठी गेले असता पोष्ट आँफीस मध्ये अशा विद्यार्थ्यांना सांगितले जात आहे की, सध्या खाते उघडणे बंद आहे. 

दोन वर्षांपासून परळीतील विद्यार्थी का आहेत शिष्यवृत्तीपासून वंचित 

sakal_logo
By
प्रा. प्रविण फुटके

परळी वैजनाथ (बीड) : शहरातील विविध महाविद्यालयातील अकरावी ते तृतीय वर्षातील हजारावर विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळाला नसून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बँकेच्या आधार लिंक मध्ये अडकून बसली आहे. आता समाजकल्याण विभागाकडून पोष्ट आँफीसमध्ये खाते उघडण्याचे निर्देश देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


शहरात पाच वरिष्ठ महाविद्यालय असून उच्च माध्यमिक शाळा नऊच्या आसपास आहेत. या विविध महाविद्यालयात गेल्या दोन वर्षांपासून प्रवेश घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांना ईबीसी व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत नाही. यासंदर्भात महाविद्यालयाशी संपर्क साधला असता महाविद्यालयाने सांगितले की, समाजकल्याण विभाग बीड यांच्याकडून आम्हाला संपूर्ण शहरातील विविध महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या व शिष्यवृत्ती फाँर्म भरलेल्या व ज्यांच्या बँकेच्या खात्याशी आधार लिंक झालेले नाही अशा विद्यार्थ्यांची यादी प्राप्त झाली असून यामध्ये जवळपास हजारावर विद्यार्थी आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ज्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही कारण या विद्यार्थ्यांचे बँकेचे खाते आधारकार्ड लिंक झालेले नाही. अशा विद्यार्थ्यांनी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये खाते काढून घेतल्यानंतर त्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा होणार आहे. मागच्या वर्षी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते काढले. आधार लिंक करण्यासाठी अर्ज बँकेत दाखल केले. बँकेने आधार लिंक झाले असे सांगितले. तरीपण हे खाते आधारलिंक नाही म्हणून शिष्यवृत्ती जमा झाली नसल्याचे समाजकल्याण विभागाने सांगितले. यासंदर्भात आताही विद्यार्थी बँकेत जावून आधार लिंकसाठी पुन्हा अर्ज करत आहेत. बँक या विद्यार्थ्यांना सांगते की, तुमच्या खात्याला आधार लिंक आहे. मग यासंदर्भात नेमकी चुक कुणाची आणि याची शिक्षा विद्यार्थ्यांना का असा प्रश्न विद्यार्थी वर्गाकडून विचारला जात आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कारण आता शिष्यवृत्ती पाहिजे असेल तर पोष्ट आँफीसमध्ये खाते उघडावे लागेल. काही विद्यार्थी पोष्ट आँफीस मध्ये खाते उघडण्यासाठी गेले असता पोष्ट आँफीस मध्ये अशा विद्यार्थ्यांना सांगितले जात आहे की, सध्या खाते उघडणे बंद आहे. नंतर सुरू झाल्यास उघडण्यात येतील. या सर्व प्रकरणामध्ये अगोदरच विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळालेली नाही. आता पुन्हा या घोळात विद्यार्थ्यांना किती दिवस वाट पाहावी लागेल हे सांगता येत नाही. म्हणून समाजकल्याण विभागाने हा घोळ लवकरात लवकर मिटवून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

(संपादन-प्रताप अवचार)