esakal | Coronavirus : उस्मानाबाद जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्क्यावर!  
sakal

बोलून बातमी शोधा

corona photo.jpg

जिल्ह्यामध्ये शनिवारी 58 जणांना कोरोनाची लागन झाली असुन सुदैवाने मृत्युची नोंद नसली तरी मृत्युदरमध्ये घट झालेली दिसत नाही. दिवसभरामध्ये 33 रुग्णांना बरे करुन घरी पाठवून देण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 14 हजार 651 इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यातील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढून 94.52 टक्के इतके झाले आहे. 

Coronavirus : उस्मानाबाद जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्क्यावर!  

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये शनिवारी 58 जणांना कोरोनाची लागन झाली असुन सुदैवाने मृत्युची नोंद नसली तरी मृत्युदरमध्ये घट झालेली दिसत नाही. दिवसभरामध्ये 33 रुग्णांना बरे करुन घरी पाठवून देण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 14 हजार 651 इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यातील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढून 94.52 टक्के इतके झाले आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसामध्ये चाचण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. त्यातही शाळा होणार असल्याने त्याच्याशी सबंधित असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या चाचण्या घेण्यात येत आहे. शुक्रवारी जवळपास साडेतीन हजाराहुन अधिक चाचण्या झालेल्या होत्या. त्यातील शिक्षकाचा विचार केला तर 30 ते 32 जणांना कोरोनाची लागन झालेली होती. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शनिवारी पुन्हा चाचण्या करण्यात आल्या असुन तीन हजाराच्या जवळपास संशयिताची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 416 जणांचे स्वॅब चाचणी घेण्यात आली होती, त्यातील 18 जणांना लागन झाल्याचे आढळुन आले आहे. तर दोन हजार 248 इतक्या रुग्णांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली असुन त्यातील 36 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे दिसुन येत आहे. त्यातही तुळजापुरच्या 21 जणांना कोरोनाची लागन झाली असल्याचे पाहयला मिळाले आहे. तर कळंबच्या अकरा जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. उस्मानाबाद नऊ, वाशी नऊ, परंडा चार, भुम दोन, उमरगा एक, लोहारा एक अशी तालुकानिहाय वाढलेल्या रुग्णांची संख्या आहे.  

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


उस्मानाबाद कोरोना मीटर 

  • एकुण रुग्णसंख्या - 15500
  • बरे झालेले रुग्ण - 14651
  • उपचाराखील रुग्ण - 291 
  • एकुण मृत्यु - 558 
  • आजचे बाधित - 58
  • आजचे मृत्यु - 00
loading image