
नेहमीच्या बॅनरबाजीला कंटाळलेल्या नागरिकांनी अशी गांधीगिरी केली असावी, असे म्हणत अनेकांनी याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
अंबाजोगाई (जि.बीड) : शहरातील एका भर चौकात काही जणांनी कुत्र्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर लावल्याने चर्चेचा विषय झाला होता. नेहमीच्या बॅनरबाजीला कंटाळलेल्या नागरिकांनी अशी गांधीगिरी केली असावी, असे म्हणत अनेकांनी याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या डिजिटलच्या जमान्यात वाढदिवस असो, की स्वागत समारंभ, विविध जाहिरातीचे फलक सार्वजनिक रस्त्याच्या बाजूला लागलेले असतात.
काहीवेळा तर याचा कहरच असतो. कुठलाही चौक रिकामा नसतो. अशा या बॅनरबाजीला कंटाळून शहरातील सदर बाजार चौक परिसरात काही जणांनी मोती या कुत्र्याला शुभेच्छा देणारे बॅनर लावले. त्यावर ' जोजो तर्फे मोती यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा' असे वाक्य ठळक अक्षरात लिहिले आहे.
मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा
एकच चर्चा
शहरात असे बॅनर झळकल्याचे समजताच, अनेकांनी त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केले. त्यामुळे हा विषय दिवसभर चर्चेचा ठरला होता.
संपादन - गणेश पिटेकर