esakal | प्रधानमंत्री आवास योजनेत औरंगाबाद प्रथम तर उस्मानाबाद जिल्हा परिषद द्वितीय
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद

विविध आवास योजनांची उत्तमरीतीने अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले

प्रधानमंत्री आवास योजनेत औरंगाबाद प्रथम तर उस्मानाबाद जिल्हा परिषद द्वितीय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)ची अंमलबजावणी करण्यामध्ये मराठवाडा विभागात औरंगाबाद जिल्हा परिषदेने प्रथम तर उस्मानाबाद जि. प. द्वितीय क्रमांक मिळवला आहे. विविध आवास योजनांची उत्तमरीतीने अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात हा सोहळा पार पडला. यावेळी जि. प. अध्यक्षा मीना शेळके, उस्मानाबाद जि. प. अध्यक्षा अस्मिता कांबळे, सहायक उपायुक्त (विकास) वीणा सुपेकर आदींची उपस्थिती होती. यावेळी श्री. केंद्रेकर यांनी मार्गदर्शन केले. अस्मिता कांबळे यांनी निधी वाढवण्याची मागणी केली. प्रास्ताविक सहायक उपायुक्त (विकास) वीणा सुपेकर यांनी केले.

पुरस्कार विजेते -

उत्कृष्ट जिल्हा परिषद राज्य पुरस्कृत योजनेमध्ये
- प्रथम : उस्मानाबाद जिल्हा परिषद
- द्वितीय : औरंगाबाद जिल्हा परिषद
- तृतीय : परभणी जिल्हा परिषद

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) साठी
- प्रथम : औरंगाबाद जिल्हा परिषद
- द्वितीय : उस्मानाबाद जिल्हा परिषद
- तृतीय : हिंगोली जिल्हा परिषद

उत्कृष्ट पंचायत समिती पुरस्कार राज्य पुरस्कृत योजनेसाठी
- प्रथम : मानवत पंचायत समिती (परभणी)
- द्वितीय : लोहारा पंचायत समिती (उस्मानाबाद)
- तृतीय : पालम पंचायत समिती (परभणी)

हेही वाचा: मिरवणूक न काढता जागेवरच करणार ‘श्रीं’चे विसर्जन

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)
- प्रथम : खुलताबाद पंचायत समिती (औरंगाबाद)
- द्वितीय : पालम पंचायत समिती (परभणी)
- तृतीय : वाशी पंचायत समिती (उस्मानाबाद)

जागा उपलब्धता व वाळू उपलब्धतेबाबत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुके राज्य पुरस्कृत योजनेसाठी
- प्रथम : नायगाव तालुका (नांदेड)
- द्वितीय : वैजापूर तालुका (औरंगाबाद)

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) साठी
- प्रथम : पैठण तालुका
- द्वितीय : सिल्लोड तालुका

हेही वाचा: राखी बांधल्याने त्याच्यासोबत गेली... पण त्याच्या मनातच होते काळंबेरं

उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारामध्ये राज्य पुरस्कृत योजनेसाठी
- प्रथम : चुडावा ग्रामपंचायत, तालुका - पूर्णा, (परभणी)
- द्वितीय : धानुरी ग्रामपंचायत, तालुका - लोहारा, (उस्मानाबाद)
- तृतीय : इरळद ग्रापंचायत, तालुका - मानवत, (परभणी)

प्रधानमंत्री आवास योजने (ग्रामीण) साठी
- प्रथम : पारगाव ग्रामपंचायत, तालुका - वाशी, (उस्मानाबाद)
- द्वितीय : सावळदबरा ग्रामपंचायत, तालुका - सोयगाव, (औरंगाबाद)
- तृतीय : जळकीघाट ग्रामपंचायत, तालुका -सिल्लोड, (औरंगाबाद)

वित्तीय संस्था निकषामध्ये राज्य पुरस्कृत योजना व प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) या दोन्ही निकषासाठी
- प्रथम : महिंद्रा होम फायनान्स लिमिटेड सेलू (परभणी)

loading image
go to top