esakal | महिला PSIला इमारतीवरून फेकून दिल्याप्रकरणी पोलिसाला 7 वर्षांची शिक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

महिला PSIला इमारतीवरून फेकून दिल्याप्रकरणी पोलिसाला शिक्षा

महिला PSIला इमारतीवरून फेकून दिल्याप्रकरणी पोलिसाला शिक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद: महिला पोलिस उपनिरीक्षकास जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस नाईक आशिष ढाकणे (वय ३२) याला सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश नीता मखरे यांनी सोमवारी (ता. १९) सात वर्ष सश्रम कारावास व २५ हजार रुपयांची शिक्षा सुनावली.

हेही वाचा: लातूर-उस्मानाबादकरासांठी गुड न्यूज

याविषयी अधिक माहिती अशी की, ३१ मे २०१९ ला सकाळी सहाच्या सुमारास शहरातील श्रीकृष्ण नगरमधील निर्मल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक मनीषा गिरी या इमारतीवरून पडल्याने जखमी झाल्या होत्या. या प्रकरणी प्रथमदर्शनी गिरी यांनी अज्ञात कारणावरून उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. त्यानुसार तसाच गुन्हा पोलिस ठाण्यात नोंदविला होता. मात्र, महिनाभरानंतर उपचारादरम्यान गिरी यांनी पोलिसांना जबाब दिला.

हेही वाचा: उस्मानाबाद जिल्ह्यात 'स्पर्श'मुळे आरोग्य सेवेला मिळतेय बळकटी!

तेव्हा पोलिस मोटार परिवहन विभागामध्ये सेवेत असलेला ढाकणे याने त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याचे जबाबात सांगितले. ढाकणे विरोधात २९ जून २०१९ गुन्हा नोंद झाला होता. त्याला न्यायालयाने सात वर्ष सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शासकीय अभियोक्ता म्हणून एस. बी. जाधवर यांनी युक्तिवाद केला.

हेही वाचा: उस्मानाबाद जिल्ह्याची ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्तीकडे वाटचाल

वरिष्ठ अधिकारी विनाकारण बदनाम

ही घटना घडल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणाची मोठी चर्चा झाली होती. या प्रकरणात विनाकारण एका वरिष्ट अधिकाऱ्याचे नाव आले होते. त्यांच्या त्रासाला कंटाळूनच महिला अधिकाऱ्यांनी हे कृत्य केल्याचे भासविले गेले होते. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांची कसून चौकशीही करण्यात आली होती. मात्र, स्वतः महिला अधिकारी शुद्धीवर आल्याने त्यांनी खरा प्रकार सांगितल्याने या प्रकरणाचा उलगडा झाला. तेव्हा त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सुटकेचा निःश्वास सोडला.

loading image