esakal | उस्मानाबाद जिल्ह्यात 'स्पर्श'मुळे आरोग्य सेवेला मिळतेय बळकटी!
sakal

बोलून बातमी शोधा

आदित्य बिर्ला कॅपिटलच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेल्या फिरत्या मोबाईल मेडिकल युनिटचा प्रारंभ सोमवारी (ता.१९) लातूर परिमंडळचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ.एकनाथ माले व आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते यांच्या हस्ते फीत कापून व हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.

उस्मानाबाद जिल्ह्यात 'स्पर्श'मुळे आरोग्य सेवेला मिळतेय बळकटी!

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : नेहमीच दर्जेदार व आपुलकीच्या आरोग्य सेवेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य सेवेत नावलौकिक मिळवलेल्या सास्तुरच्या प्राईड इंडिया स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या चौथ्या फिरत्या वैद्यकीय आरोग्य पथकामुळे (मोबाईल मेडिकल युनिट) उस्मानाबाद जिल्ह्याच्या (Osmanabad) आरोग्याला (Health) बळकटी मिळत आहे. आदित्य बिर्ला कॅपिटलच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेल्या फिरत्या मोबाईल मेडिकल युनिटचा प्रारंभ सोमवारी (ता.१९) लातूर परिमंडळचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ.एकनाथ माले व आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते यांच्या हस्ते फीत कापून व हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी युवा सेनेचे किरण गायकवाड, उमरगा (Umarga तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, तालुका शिवसेनाप्रमुख बाबुराव शहापुरे, स्पर्शचे प्रकल्प अधिकारी, रमाकांत जोशी, कार्यक्रम अधिकारी अच्युत आदटराव, डॉ.मीरा देशपांडे, डॉ. अशोक मस्के, डॉ.दीपिका चिंचोळी, डॉ. वैशाली जाधव, डॉ. युवराज हक्के, डॉ प्रशांत जाधव यांच्यासह उमरगा, लोहारा (Lohara), तुळजापूर (Tuljapur) तालुक्याच्या विविध गावातील सरपंच उपस्थित होते. (sparsh health service available in osmanabad district glp 88)

हेही वाचा: महिला पोलिस उपनिरीक्षकास इमारतीवरुन दिले फेकून, आरोपीस शिक्षा

प्रकल्प अधिकारी श्री.जोशी म्हणाले की, ग्रामीण भागातील तसेच दुर्गम अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा पोचण्यासाठी येणाऱ्या अडचणी तसेच गावकऱ्यांच्या आर्थिकदृष्ट्या येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन  प्राईड इंडिया स्पर्शमार्फत उस्मानाबाद जिल्ह्यात तीन फिरत्या मोबाईल मेडिकल युनिट मार्फत आरोग्य सेवा पोचवण्यात येत होती. आदित्य बिर्ला कॅपिटलच्या सहकार्याने चौथ्या मोबाईल मेडिकल युनिटचा प्रारंभ होत आहे, या चार फिरत्या मोबाईल मेडिकल युनिटमार्फत उस्मानाबाद - लातूर जिल्ह्यातील १२४ दुर्गम व अतिदुर्गम गावात आरोग्य तपासणी बरोबरच औषधी, लसीकरण, गरोदर माता तपासणी व उपचार, ज्येष्ठ नागरिक तपासणी व उपचार (प्रसुती पूर्व व प्रसूती पश्चात सेवा) रक्त, लघवी तपासणी, इ.सी.जी या सर्व सेवा सुविधा उपलब्ध असणार आहेत. 'सास्तूर पटर्न' संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झाला आहे. कोरोना काळात स्पर्शने जी आपुलकीची दर्जेदार आरोग्य सेवा दिली. त्याबद्दल संपूर्ण राज्यात आरोग्य सेवेच्या सास्तूर पटर्नचे कौतुक होत आहे, असे गौरवोद्गार डॉ. माले यांनी काढले. आरोग्य सेवेचा सास्तूर पटर्नला आणखी बळकट दोनशे खाटांच्या मंजुरीचा प्रस्ताव सादर करणार असल्याचे तसेच या ठिकाणी नेत्र रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करणार असल्याचे डॉ.माले यांनी सांगितले.

हेही वाचा: दोघांचे प्रेम पाहून पोलिस भारावले! चार किलोमीटर पळवल्यानंतर...

२४ गावांत आरोग्य सेवा

स्पर्श रुग्णालयाने तीन फिरत्या वैद्यकीय सेवेत परंडा (Paranda) तालुक्यातील आठ, भूम (Bhoom) -५, वाशी (Washi) - ७, तूळजापूर - ८, उमरगा - ३०, लोहारा-३१, औसा (Ausa) - १२, उस्मानाबाद - एक अशा १०२ गावांत सेवा सुरू आहे. आता नव्याने सुरु झालेल्या युनिटमध्ये उमरगा तालुक्यातील हंद्राळ, कराळी, कोळसुर (कल्याण), कोळसुर (गुंजोटी), मळगीवाडी, दगडधानोरा, आष्टा (जहागीर), चिंचकोट, गुगळगाव, वागदरी, औराद, कदेर, कोरेगाव कोरेगाववाडी, काटेवाडी , नाईकनगर, सुंदरवाडी या १७ गावांचा तर तुळजापूर तालुक्यातील मूर्टा, होर्टी, वाडाचा तांडा, कार्ला, मेसाई जवळगा, वडगाव देव, किलज या सात गावांचा समावेश आहे.

स्पर्शच्या ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला तोड नाही. २५ वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपानंतर प्राईड इंडियाने सुरु केलेले रुग्णाल आता कोरोनासारख्या आपत्तीत मोलाचे ठरले आहे. विशेषतः गरोदर मातांची विशेष काळजी, उपचार, शस्त्रक्रिया मोफत होतात. उमरगा, लोहारा, तूळजापूर तालुक्यासह लातूर जिल्हा आणि महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवरील गावातील रूग्ण येथे उपचारासाठी येतात. त्यामुळे खाटांची संख्या वाढविणे गरजेचे झाले आहे. मंत्रिमंडळ बैठकीत, अधिवेशनात यासाठी सतत पाठपुरावा करून मंजुरीसाठी प्रयत्न रहाणार आहे.

- ज्ञानराज चौगुले, आमदार

loading image