police recruitment sweeper son satish patole became mumbai police jalna
police recruitment sweeper son satish patole became mumbai police jalnasakal

Police Recuitment : झाडूविक्रेत्याच्या मुलास आता खाकी वर्दी; मुंबई पोलिस भरतीत निवड

रांजणीच्या सतीश पाटोळेचे पोलिस भरतीत यश

घनसावंगी : आई-वडिलांचा झाडू बनवून विक्रीचा व्यवसाय, घरची परिस्थिती बिकट, तेव्हा जालन्यात राहून मिळेल तेथे वीज दुरुस्तीची कामे करून पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या सतीश पाटोळे याचे खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मुंबई पोलिस भरतीत त्याचे निवड झाली आहे.

police recruitment sweeper son satish patole became mumbai police jalna
Police Recruitment : सख्ख्या भावा-बहिणीची पोलिस भरतीत एकाच वेळी निवड; आईच्या आनंदाला ‘भरते’

रांजणी येथील तुळशीराम गोविंदराव पाटोळे व पंचफुला पाटोळे हे दाम्पत्य झाडू विक्रीचा व्यवसाय करतात. घरी शेतजमीन नाही, कष्ट केल्याशिवाय चूल पेटत नाही. अठरा विश्‍व दारिद्र्य असलेल्या घरात शैक्षणिक वातावरण नाही, अशी स्थिती.

तुळशीराम यांची तीन मुले, मोठा किशोर व सर्वात लहान नितीन हे ट्रॅक्‍टरवर माती भरणे, मुरूम भरणे, वाळू भरणे असे काम करतात. घरची परिस्थतीत पाहता त्यांना मध्येच शिक्षण सोडावे लागले. मात्र मधला मुलगा सतीश तुळशीराम पाटोळे यास शिक्षणाची आवड.

police recruitment sweeper son satish patole became mumbai police jalna
Mumbai Police : ट्विटरद्वारे मुंबईत घातपाताची मुंबई पोलिसाना धमकी.. नांदेडमधून एकाला अटक...

त्यामुळे वडिलांसह दोन्ही भावंडांनी त्यास मदत केली, वारंवार प्रोत्साहन दिले. त्यामुळे सतीशने लहानपणापासून शिक्षणाची कास सोडली नाही. गावात चौथीपर्यंत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले. सरस्वती भुवन विद्यालयात दहावी पूर्ण केली.

जयपूर येथे नातेवाइकांकडे राहून कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. पारंपरिक शिक्षणापेक्षा व्यावसायिक अभ्यासक्रम करावा म्हणून सतीशने घनसावंगीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत इलेक्ट्रीशियनचा अभ्यासक्रम पूर्ण केला. नोकरीसाठी प्रयत्न केले, पण नोकरी मिळाली नाही.

मात्र जालना येथे रुम करून राहिल्यानंतर विजेच्या दुरुस्तीची मिळेल ती कामे तो करू लागला. शिवाय पोलिस किंवा सैन्यदलात जाण्याचा निर्धार करीत त्यादृष्टीने शरीरयष्टीची तयारी सुरू केली. दररोज व्यायाम, कसरत आणि अभ्यास यात सातत्य ठेवले. पोलिस भरतीची जाहिरात आली, त्यात अर्ज भरल्यानंतर सकाळ, दुपार, संध्याकाळ असे तीन वेळा भरतीची तयारी सुरू केली. मुंबई येथे पोलिस भरतीच्या वेळी आजारी पडला, मात्र तशा स्थितीतही न डगमगता परीक्षा दिली. यात लेखी आणि मैदानी परीक्षेत चांगले गूण मिळविले.

police recruitment sweeper son satish patole became mumbai police jalna
Police Transfer : राज्यातील 20 पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या

पोलिस भरतीत सतीशची निवड झाली. या यशानंतर त्याचे आई-वडील, भावंडांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान, ग्रामपंचायतीतर्फे सरपंच अमोल देशमुख, उपसरपंच रहीम शेख यांच्या उपस्‍थिती सतीशचा सत्कार करण्यात आला. यावेळी दीपक वरखडे, रमन जाधव, श्रीमंत मगर,संजय मांडवे, मारोती पाटोळे आदींची उपस्थिती होती.

घरची स्थिती बिकट असल्याने जालन्यात मिळेल ती विजेच्या दुरुस्तीची कामे केली. पोलिस भरतीची तयारी केली. लेखी व मैदानी परीक्षेचा सराव केला. त्यात यश मिळाले. भविष्यात कुटुंबाला आधार देणार आहे.

— सतीश तुळशीराम पाटोळे, युवक, रांजणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com