देशभरातील शोधले दहा हजार जण, खुनातील संशयित निघाला गावातच 

मनोज साखरे
Wednesday, 18 December 2019

तपास सोपा नव्हता, साक्षीदारही नव्हते. जखमीनेही अंधारात कुणाला पाहिले नव्हते. ऑनलाइन कंपनीतील ग्राहकाचा डाटा संपूर्ण देशभरातील होता. या सर्व 246 जणांची चौकशी करणे आव्हानात्मक होते. तरीही मोठ्या शिताफीने ग्रामीण पोलिसांनी तपास करून खून, जबरी चोरीचा छडा लावला. 

औरंगाबाद - काखेत कळसा आणि गावाला वळसा ही म्हण औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या एका तपासाला तंतोतंत जुळली आहे. कारण एका खुनातील संशयितांच्या शोधासाठी सात महिने औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या पथकाने देशभरातील तब्बल दहा हजार जणांचा डाटा गोळा केला, दोनशे शेहेचाळीस जणांची चौकशी केली. मात्र ज्याचा देशभर शोध सुरू होता तो मुख्य संशयित सिल्लोडला, तर इतर दोन औरंगाबाद व परतूरचे निघाले. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अजय गुलाबराव रगडे (वय 30, रा. सातारा परिसर), चेतन अशोक गायकवाड (34, रा. सिल्लोड), संदीप आसाराम गायकवाड (26, रा. परतूर, जि. जालना) अशी संशयितांची नावे आहेत. यातील मुख्य संशयित चेतन आहे. ऊसतोडीचे मुकादम म्हणून ते काम करतात.

हेही वाचा : video - मनुष्यालाच नव्हे तर चक्क कुत्रे, मांजरांनाही होतो मधुमेह  

बारा मे 2019 ला रात्री दहाच्या सुमारास सिल्लोड येथील वाईनशॉपचे भिकन निळुबा जाधव (48) व व्यवस्थापक लक्ष्मण पुंजाजी मोरे चार लाख रुपये घेऊन दुचाकीने घरी निघाले. त्यावेळी संशयितांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला. यात भिकन जाधव यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिल्लोड ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला.

अत्यंत सूक्ष्म तपास केल्यानंतर पोलिसांना अजय रगडे याचे नाव समोर आले. यापूर्वी बदनापूर येथेही वाईनशॉपचालकाला लुबाडल्याचा प्रकार घडला होता. या दोन्ही गुन्ह्यांचे विश्‍लेषण करतानाच अजयकडे एक चाकू सापडला. तो चाकू ऑनलाइन खरेदी केल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी अजयचा साथीदार चेतन व संदीप यांना ताब्यात घेत अटक केली. 

क्‍लिक करामाझ्या पप्पाचा पगार वाढवा ना, चिमुकलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र   

सात महिन्यांत छडा 

तपास सोपा नव्हता, साक्षीदारही नव्हते. जखमीनेही अंधारात कुणाला पाहिले नव्हते. ऑनलाइन कंपनीतील ग्राहकाचा डाटा संपूर्ण देशभरातील होता. या सर्व 246 जणांची चौकशी करणे आव्हानात्मक होते. तरीही मोठ्या शिताफीने ग्रामीण पोलिसांनी तपास करून खून, जबरी चोरीचा छडा लावला. 

हेही वाचा : video : अरेच्चा ! कोंबडीशिवाय जन्मतात पिले ! 

  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Solved Murder Case in Aurangabad