जळकोट तालुक्यात २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका; उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला

शिवशंकर काळे
Friday, 25 December 2020

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होऊन चार वर्षे लोटली आहेत. घोणसी गटातून भाजप, माळहिप्परगा व वाजरवाडा गटातून काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते.

जळकोट (जि.लातूर) :  तालुक्यात २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरु झाल्या आहेत. घोणसी गटाचे जिल्हा परिषद सदस्य यांच्या घोणसी गावची, वाजरवाडा पंचायत समिती गटाचे पंचायत समिती सदस्य तथा सभापती यांच्या वाजरवाडा, जिल्हा परिषदेचे सदस्य तथा गटनेते यांच्या कुणकी गावची, वाजरवाडा जिल्हा परिषद गटाच्या विराळ गावची,राष्टवादीचे तालुकाध्यक्ष यांच्या धामणगाव गावची,शिवसेनेचे तालुकाप्रमुख यांच्या डोंगर कोनाळी आदिसह एकुण २७ गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत.

या लोकप्रतिनिधींना गावचा गढ राखून गटातील ग्रामपंचायती निवडून आणण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार असून कोणता लोकप्रतिनिधी आपल आपले गढ राखण्यासाठी कोणत्या व्युवहरचना आखणार हे येणारा काळ ठरवणार आहे.

धक्कादायक! कोरोनावर मात केलेल्या महिलेच्या शरीरात झाला पस; जगातील सातवी, तर भारतातील पहिलीच केस

दरम्यान जिल्हा परिषद सदस्य संतोष तिडके याच्या कुणकी गावासह त्यांच्या गटातील डोंगरकोनाळी, लाळी बु, येवरी, पाटोदा खुर्द, डोगरगाव, कोळनुर, बेळसांगवी आदि गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणूक लागल्या आहेत. तर जिल्हा परिषद सदस्या सौ. अनिता परगे यांच्या घोणसी गटातील घोणसी, बोरगाव, एकुर्गा खुर्द, तिरुका, हाळदवाढवणा, अतनुर, गव्हाण मरसांगवी, शिवाजी नगर तांडा, मेवापुर, चिचोली, सुल्लाळी, रावणकोळा, आदि गावाचा समावेश आहे.

याच बरोबर वाजरवाडा गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. रुक्मिणबाई जाधव यांच्या स्वतःचे गाव विराळ सह त्यांच्या गटातील वाजरवाडा, वडगाव, धामणगाव, येलदरा, विराळ, शेलदरा, आदिचा गावचा समावेश आहे. राष्टवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन आगलावे यांच्या धामणगाव व शिवसेनेचे तालुका प्रमुख संगम टाले यांच्या डोंगर कोनाळी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरविंद नागरगोजे  यांच्या सोनवळा या गावची निवडणूक लागली असून या लोकप्रतिनिधींना आपले गाव राखून आपल्या गटातील गावाच्या ग्रामपंचायती निवडून आणायाच्या आहेत. त्यामुळे यांची चांगलीच कसरत लागली आहे.

वाजरवाडा गटातील सहा, माळहिप्परगा गटातील आठ, घोणसी गटातील तेरा ग्रामपंचायतीच्या निवडणूका लागल्या यामध्ये सर्वाच जास्त घोणसी गटातील असल्यामुळे जिल्हा परिषद सदस्या सौ. अनिता परगे यांची निवडून आणण्यासाठी कसरत लागणार आहे.

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून मोठा बदल, संपर्कमंत्री म्हणून यांची निवड

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होऊन चार वर्षे लोटली आहेत. घोणसी गटातून भाजप, माळहिप्परगा व वाजरवाडा गटातून काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. जळकोट पंचायत समिती काँग्रेसच्या ताब्यात आहे. यामुळे तालुक्यात सर्वात जास्त वर्चस्व काँग्रेसचे आहे. त्यामुळे या लोकप्रतिनिधीनी चार वर्षात आपल्या गटातील गावचा किती विकास केला यांच्यावर यांना ग्रामपंचायत निवडणुकीत मते मागण्याचा अधिकार आहे.

स्वत:चे गाव संभाळून आपल्या गटातील ग्रामपंचायती निवडून आणून आपली ताकत पक्षाला दाखवावी लागणार आहे. अनेक गावात दुहरी तर काही गावात तिहरी निवडणूक होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक जुनी गावातील मंडळी निवडणुकीतून माघार घेतली असून अनेक नवतरुण ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दोन दिवसात तहसीलच्या निवडणूक विभागाकडे एकाही उमेदवारांनी अर्ज केला नाही. ता. २५ पासून तीन दिवस सुट्टया आहेत. त्यामुळे सोमवारपासून तहसिल कार्यलय परिसरात जत्रेचे स्वरुप दिसून येणार आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political news Gram Panchayat Election Jalkot Latur