धोकादायक..! डॉक्टर, परिचारिकेला कोरोना; संपर्कातील लोकांनी स्वॅब देऊनही क्वारंटाईन ऐवजी ते लागले कामाला 

तानाजी जाधवर
Friday, 24 July 2020

एखादा कर्मचारी व डॉक्टर पॉझिटिव्ह आला तरी त्यांच्या संपर्कातील लोकांना स्वॅब देऊनही काम करावे लागत आहे. अहवाल येईपर्यंत अशा लोकांना क्वारंटाईन करण्याची गरज असताना रुग्णसंपर्क वाढण्याचा धोका का ओढावून घेतला जात आहे.

उस्मानाबाद : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर ताण येत आहे. एखादा कर्मचारी व डॉक्टर पॉझिटिव्ह आला तरी त्यांच्या संपर्कातील लोकांना स्वॅब देऊनही काम करावे लागत आहे. अहवाल येईपर्यंत अशा लोकांना क्वारंटाईन करण्याची गरज असताना रुग्णसंपर्क वाढण्याचा धोका का ओढावून घेतला जात आहे. याविषयी जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्यानी मनुष्य बळाची मोठी कमतरता असल्याची बाब सांगितली आहे.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 
सध्या जिल्ह्यामध्ये ६११ कोरोनाचे रुग्ण झाले असुन हा आकडा वाढत असताना शासकीय रुग्णालयाच्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे यंत्रणेवर मोठा ताण पडल्याचे दिसुन येत आहे. सध्या त्या ठिकाणी काही कंत्राटी कर्मचारी व डॉक्टर सेवा देत असले तरी त्यांना वेतन कमी असल्याने कोणीही धोका स्विकारायला तयार नाही. अशावेळी इतर यंत्रणेची मदत घेण्याची आवश्यकता आहे.

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक    
जिल्हा परिषदेमध्ये शासकीय कर्मचारी व डॉक्टर असतानाही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जिल्हा रुग्णालयाला सहकार्य केले जात नसल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही ग्रामीण भागाऐवजी कोरोनाच्या ड्युटीवर लावणे सध्या महत्वाचे ठरणार आहे. सध्याच्या स्थितीला प्राधान्य कशाला द्यायचे याची बाब नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. तरीही लॉकडाऊन व इतर बाबी तत्काळ करणाऱ्या जिल्हा प्रशासनाला अशा महत्वाच्या गोष्टी का सूचत नाही असाही सवाल आता उपस्थित होत आहे. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

जिल्ह्यामध्ये ४२ प्राथमिक आरोग्य केंद्र असून अपवाद वगळता सगळीकडे दोन वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यातील एक वैद्यकीय अधिकारी कोरोनाच्या ड्युटीसाठी लावल्यास मोठ्या प्रमाणात आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होणार आहे. सध्याच्या स्थितीला जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचारापेक्षा इतर गोष्टीमध्येच अधिक लक्ष द्यावे लागत आहे. याचा विचार करुन जिल्हा प्रशासनाकडून हा तत्काळ निर्णय घेणे अपेक्षित आहे. याशिवाय सध्या समुदाय विकास अधिकारी नावाची नवे पद निर्माण करण्यात आले आहे. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

त्याचीही संख्या जिल्ह्यामध्ये शंभरच्या जवळपास आहे, मग अशा लोकांना तातडीने कोरोनाच्या ड्युटीसाठी लवून यंत्रणेवरील ताण कमी करता येणे शक्य आहे. शिवाय या लोकांनी प्रशिक्षण देखील घेतले आहे तरीही यंत्रणेकडून अशा महत्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: positive contact people give swabs but no quarantine