esakal | सामुदायिक जबाबदारीतून बाल विवाह रोखणे शक्य
sakal

बोलून बातमी शोधा

child marriage

सामुदायिक जबाबदारीतून बाल विवाह रोखणे शक्य

sakal_logo
By
सुनिल इंगळे

औरंगाबाद: कोरोना काळात बालविवाहांच्या घटना मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत. जिल्ह्यात मे ते जुलैदरम्यान १५ बालविवाह रोखण्यास यश आले आहे. परंतु, असे अनेक बालविवाह झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. ही अंत्यत चिंतेची बाब असून गावातील सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका तसेच गावातील नागरिक यांच्या सामुदायिक जबाबदारीतून बालविवाह रोखले जाऊ शकतात, असे मत सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

मुलींकडे ओझे म्हणून बघण्याचा असलेला दृष्टिकोन आजही अनेक भागांमध्ये बदललेला दिसत नाही. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांमध्येही पळवाटा शोधत १४ ते १८ वयामध्ये मुलींचे विवाह होत आहेत. यात ऊसतोड कामगार तसेच फिरस्ती करणाऱ्या समाजातील कुटुंबांना, मुलींना घरी सोडून जाणे किंवा बरोबर घेऊन जाणे, दोन्ही धोक्याचे वाटते. त्यामुळे त्यांच्यात, मुलगी वयात आली की लग्न लावून देण्याचा कल दिसतो. तसेच गावागावांत, ग्रामीण भागांत, आदिवासी पाड्यांवर, आजही माध्यमिक शिक्षणाच्या सुविधा नाहीत. सुमारे ४० टक्के मुलींची माध्यमिक वर्गात असतानाच शाळा सुटते.

हेही वाचा: हिंगोलीत सलग तीन दिवस पाऊस; अनेक गावांचा संपर्क तुटला

गावात शाळा नाहीत, दूरच्या शाळेपर्यंत जाण्यासाठी वाहतुकीचे पर्याय नाहीत, मासिक पाळीच्या काळात शाळांत शौचालये, पाणी यांसारख्या मूलभूत गरजेच्या सुविधा नाहीत, अशा अनेक कारणांमुळे आजही मुलींचे शिक्षण अर्ध्यावर राहते. त्‍यात कोरोना काळात अनेकांची कामे गेली, घरात पैशांची अडचण, कर्जाचा डोंगर अशा अनेक कारणे बालविवाहास कारणीभूत ठरतात. या बालविवाहाची गावातील तलाठ्यांपासून ते पोलिसांपर्यंत अनेकांना, अनेकदा याबाबत माहिती असते. पण सगळेच परस्पर सहमतीने होत असल्याने, कारवाईच्या भानगडीत कोणी पडत नसल्याने गावात हे प्रकार सर्रास घडत होतात.

हेही वाचा: भाटेगावात आढळला दुर्मिळ 'मसण्याऊद' प्राणी; पहा फोटो

बाल संरक्षण समित्यांचे कार्य-
बालविवाह प्रतिबंध कायदातंर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्राम बाल संरक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या आहे. यात सरंपच हे अध्यक्ष व इतर सदस्य तर बालविवाह प्रतिबंधक अधिकारी हे ग्रामसेवक असतात. महिला बालविकास विभागाचे अधिकारी, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील अधिकारी म्हणून कार्य करतात. अशा विवाहाची माहिती दिल्यास, ते हस्तक्षेप करू शकतात. बालसंरक्षण अधिकारीही हे काम करतात. पोलिसांना पाचारण करणे; तसेच बालक वा बालिकेला बाल कल्याण समितीसमोर सादर करणे आवश्यक असते. बालिकेची विचारपूस करून, गृहभेट अहवाल मागवून, बाल कल्याण समितीने पुढील दिशा ठरविण्यात येते. बालविवाहांची माहिती १०९८ या क्रमांकावर चाइल्ड लाइनला फोन करून कळवावी.

loading image