esakal | आकडे काढणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण, बीडमध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavitaran_h_30.jpg

आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्यांचे आकडे काढल्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणात बीड ग्रामीण (जि. बीड) येथे सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकडे काढणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण, बीडमध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : सध्या मराठवाड्यात वीज चोरीचे प्रमाण वाढले असून महावितरणनेही आकडे काढण्याचा धडाका लावला आहे. आकडे टाकून वीज करणाऱ्यांचे आकडे काढल्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणात बीड ग्रामीण (जि. बीड) येथे सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांनी वीज चोरीचे आकडे काढून रोहित्र जळण्याचे प्रमाण कमी करण्याच्या सूचना अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानंतर लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप भोळे, अधिक्षक अभियंता आर. जी. कोलप यांच्या मार्गदर्शनाखाली वीज चोरीचे आकडे काढण्याचा धडाका सुरु आहे. बीड शहरासह जिल्ह्यातील काटकर वस्ती, खापरपागंरी येथील वस्तीवर वीज चोरीचे आकडे टाकून विजेचा वापर होत असल्याची माहिती महावितरण कर्मचाऱ्यांना मिळाली होती. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यावरुन वरिष्ठ तंत्रज्ञ ज्ञानेश्वर शिंदे व त्यांचे सहकारी संदीप पाखरे, किरण अंदुरे, रामेश्वर लाटे, गणेश जाणवळे यांनी संबंधित ठिकाणचे वीज चोरीचे आकडे काढले. आकडे का काढले म्हणून काढलेले आकडेही हिसकावून घेऊन अंगद रावसाहेब काटकर व त्यांची पत्नी, सुग्रीव रावसाहेब काटकर, बाळू बाबासाहेब काटकर, बाबासाहेब रावसाहेब काटकर, मनोज सुग्रीव काटकर यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण करून शिविगाळ केली. तसेच पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यास जीवे मारुन टाकू अशी धमकी दिली. याप्रकरणी तंत्रज्ञ शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीज चोरीच्या विरोधात आकडे काढण्याची मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेऊनच वीजेचा वापर करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)