

Health Minister Prakash Abitkar Inspects Pachod Rural Hospital
sakal
पाचोड: आरोग्य सुविधांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी (ता. २७) रात्री नऊ वाजेच्या सुमारास अचानक पाचोड (ता.पैठण) ग्रामीण रुग्णालयास भेट दिली. यावेळी रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरची पाहणी करताना काही यंत्रसामग्री बंद अवस्थेत आढळल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करून आवश्यक सुविधांचासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्याच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल पवार यांना सुचना दिल्या.