
जिल्हाभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे नियोजन केले जात आहे. जिल्ह्यातील रेशन दुकानातून लाभार्थींना गहू, तांदूळ तसेच डाळही वितरीत केली जात आहे. मात्र धान्य वितरीत करण्यापूर्वी रेशन मालाची तपासणी करावी, अशा सूचना पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.
हिंगोली : कोरोनाच्या संकटाने देशात सर्वत्र राष्ट्रीय आपत्तीचा सामना करावा लागत आहे. राज्य सरकार संकटाचा मुकाबला करताना विविध प्रयत्न करीत आहे. अशा वेळी रेशनच्या मालाच्या दर्जावरून सांशकता निर्माण होऊ नये, यासाठी रेशनच्या मालाची वितरणापूर्वी तपासणी केली जावी, अशा सूचना पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी नागरिकांनी घरीच राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे नियोजन केले जात आहे. जिल्ह्यातील रेशन दुकानातून लाभार्थींना गहू, तांदूळ तसेच डाळही वितरीत केली जात आहे.
हेही वाचा - सिनेस्टाइल पाठलाग करून पकडला दोन लाखांचा गुटखा
गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करावी
रेशनच्या मालाबाबत सांशकता व्यक्त केली जाऊ नये, यासाठी मालाच्या वितरणापूर्वी दर्जाची तपासणी करावी, तसेच रेशन दुकानदारांनी लभार्थींना हात धुण्यासाठी सॅनिटायझर किंवा हॅंडवॉश उपलब्ध करून द्यावे, दुकानावर मालाचे वितरण करताना गर्दी होणार नाही या दृष्टीने उपाययोजना करावी, अशा सूचना पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी केल्या आहेत.
स्वस्त धान्याच्या डाळीत धुरडा
हिंगोली : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र रेशन धान्याचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, रेशन लाभार्थींना वाटप करण्यात येत असलेल्या तूरडाळीत धुरडाच उडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे लाभार्थींमधून संताप व्यक्त केला जात आहे.
धान्य वाटप करण्याचे आदेश
कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे उद्योग धंदे, रोजगार ठप्प पडला आहे. अशा स्थितीत एक वेळचे भोजन मिळावे यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. रेशन लाभार्थीदेखील उपाशी राहू नयेत म्हणून धान्य वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार तालुकानिहाय रेशन दुकानदारांना वाटप करण्यात आले आहे.
येथे क्लिक करा - हिंगोलीत पहिल्याच दिवशी पावणे दोन लाखाची मदत
आडगाव मुटकुळे येथे निकृष्ठ डाळीचे वाटप
हिंगोली तालुक्यातील आडगाव मुटकुळे येथे रेशनचे वाटप करीत असताना तूरडाळ दर्जाहीन वाटप होत आहे. यात चक्क किडे असून बेसनासारखी डाळ वाटप करण्यात आली. त्यामुळे लाभार्थींनी या डाळीचे पुडे परत केले आहेत. या प्रकाराने लाभार्थींतून नाराजी व्यक्त होत आहे. स्वस्तधान्य दुकानातून योग्य धान्याचे वाटप करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्हाभरात रेशनचे धान्य वाटप
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात रेशनचे वाटप केले जात आहे. यासाठी लाभार्थी धान्य घेण्यासाठी स्वस्तधान्य दुकानासमोर रांगा लावत आहेत. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सच्या नियमाचे पालन होत असल्याचे चित्र आहे. तर काही ठिकाणी धान्य घेण्यासाठी गर्दी होत आहे.