
मराठवाड्याचे सुपूत्र आनंद भालेराव राजस्थान केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरुपदी
परंडा (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील डोणजा येथील प्रा. डॉ. आनंद भालेराव (Professor Anand Bhalerao) यांची राजस्थान केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांनी पाच वर्षांसाठी ही नियुक्ती केली आहे. प्रा. भालेराव यांनी पुणे येथील भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (Savitribai Phule Pune University) हायड्रोलिक अभियांत्रिकी या विषयात पीएचडी पूर्ण केली आहे. त्यांचे ४३ शोध निबंध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहेत. (Professor Anand Bhalerao Son Of Marathwada Appointed Vice-Chancellor Of Rajasthan Central University)
राजस्थान केंद्रीय विद्यापीठाच्या (Rajasthan Central University) कुलगुरूपदाचा कार्यभार त्यांनी हंगामी कुलगुरू प्रा.नीरज गुप्ता यांच्याकडून नुकताच स्वीकारला आहे.(Osmanabad)