नागरी बँकाचा 'बँक' शब्द काढण्याचा घाट

हरी तुगावकर
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

देश तसेच राज्यातील अनेक नागरी बँका चांगले काम करीत आहेत. ग्रामीण भागातील सामान्य नागरीक, शेतकऱयांच्या मदतीसाठी या बँका काम करीत आहेत. पण अशा बँकाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आता बदलत आहे. या नागरी बँकाचा `बँक` शब्द काढण्याचा घाट घातला जात आहे.

लातूर : देश तसेच राज्यातील अनेक नागरी बँका चांगले काम करीत आहेत. ग्रामीण भागातील सामान्य नागरीक, शेतकऱयांच्या मदतीसाठी या बँका काम करीत आहेत. पण अशा बँकाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आता बदलत आहे. या नागरी बँकाचा `बँक` शब्द काढण्याचा घाट घातला जात आहे. तसेच किती चांगले काम करीत असलेल्या नागरी बँकाना नवीन शाखा देणे बंद करण्यात आले आहे. या सर्व समस्यावर चर्चा करण्याकरीता लातूर येथे 16 व 17 नोव्हेंबरला महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या वतीने सेमिनार आयोजित करण्यात आल्याची माहिती या बँकेचे संस्थापक व माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

नागरी बँका, साखर कारखाने इतर संस्थामुळे ग्रामीण भाग व शहरी भागाच्या विकासासाठी मदत झाली आहे.  देशामध्ये एक हजार ५८९ नागरी सहकारी बँका असून त्याच्या शाखा 1 लाख 27 हजार आहेत. मोठे जाळे या बँकाचे आहे. बँक या शब्दावरच जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे या बँका चांगले काम करीत आहेत. असे असताना आता या बँकेच्या नावातील बँक शब्द काढण्याचा प्रस्ताव आरबीआयने केंद्र शासनाला दिला आहे. या निर्णयाला आमचा विरोध आहे. नागरी बँकावर आरबीआय व सहकार विभागाचे नियंत्रण असते. त्या मुळे या शब्द राहिला पाहिजे, असे ते म्हणाले.
तसेच 100 कोटीपर्यत ठेवी असल्यास 3 तसेच शंभर कोटी पेक्षा जास्त ठेवी असल्यास 5 तज्ज्ञ संचालक नियुक्त करावेत, असे आदेश देण्यात येत आहेत. हेच संचालक बँकाचा अध्यक्ष निवडणार आहे. सर्व व्यवहार व्यवस्थापकीय मंडळ करणार आहे. परंतू जबाबदारी आणि उत्‍तरदाईत्व निवडून आलेल्या संचालकावर टाकले जाणार आहे, हे धोरणही चुकीचे आहे.  गेल्या दिड वर्षापासून बँकाना शाखा देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक नागरी बँका आपला व्यवसाय वाढवून शकत नाहीत, अशी माहिती श्री. कव्हेकर यांनी दिली.

ऑनलाईन बँकीगमुळे व्यवहार सोपा झाला आहे. पण  कॉन्टॅक्ट लेस क्रिडीट अ‍ॅन्ड डेबीट कार्ड भारतात वापरले जाणार आहे. यात कार्ड स्वीप करण्याची गरज नाही. कॉन्टॅक्ट असलेल्या  ठिकाणी (पॉईट ऑफ सेल) संपर्कात आल्यास संबंधीताच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर होणार आहेत. नविन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा एक सायबर हल्‍ला करून दरोडा टाकला जाण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.

या सर्व प्रश्नावर 16 व 17 नोव्हेंबरला येथे महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या वतीने दोन दिवसाचे सेमिनार आयोजित करण्यात आले आहे. राज्यातील सर्व नागरी सहकारी बँकेच्या संचालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कव्हेकर यांनी दिली.

या वेळी बँकेचे उपाध्यक्ष एस.आर.मोरे, जेष्ठ संचालक सूर्यकांत शेळके, कार्यकारी संचालक अमरदिप जाधव, उपकार्यकारी संचालक बालासाहेब मोहिते, जनसंपर्क अधिकारी सोमनाथ स्वामी उपस्थित होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Public sector bank forces to remove Bank word