माजलगावात अखेर पांढऱ्या सोन्याची खरेदी सुरु, पहिल्या दिवशी ७०० क्विंटल खरेदी 

पांडुरंग उगले
Saturday, 5 December 2020

शासकीय खरेदीकेंद्र सुरु न झाल्यामुळे वेचणी करून आणलेल्या कापसाचा शेतकऱ्यांना महिनाभर सांभाळ करावा लागला. अखेर गुरुवारी (ता. तीन) माजलगावातील मोरेश्वर जिनिंगवर शासकीय कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या ७१५ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असल्याने शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे. 

माजलगाव (बीड) : शासकीय खरेदीकेंद्र सुरु न झाल्यामुळे वेचणी करून आणलेल्या कापसाचा शेतकऱ्यांना महिनाभर सांभाळ करावा लागला. अखेर गुरुवारी (ता. तीन) माजलगावातील मोरेश्वर जिनिंगवर शासकीय कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या ७१५ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असल्याने शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

यावर्षी समाधानकारक पाउस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाचे पिक जोमात आले होते; परंतु परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. उरलासुरला कापूस शेतकऱ्यांनी घरात आणला; परंतु शासकीय खरेदीच सुरु नसल्याने महिनाभरापासून त्याचा सांभाळ करावा लागला. अखेर गुरुवारी (ता. तीन) माजलगावातील मोरेश्वर जिनिंगमध्ये शासकीय खरेदीला सुरुवात झाली आहे. यावेळी बाजार समितीचे सभापती संभाजी शेजूळ, सचिव हरिभाऊ सवने, संचालक प्रभाकरराव होके, बाबासाहेब आगे, संतोष यादव आदी उपस्थित होते.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यावेळी बाजार समितीकडे सुरवातीला ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना रीतसर टोकन देऊन त्यांचे वाहन जिनिंगवर पाठवण्यात आले. खरेदीच्या पहिल्याच दिवशी एकूण ७१५ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. शासकीय कापूस खरेदी सुरु झाल्यामुळे खाजगी व्यापाऱ्यांकडून होणारी लुट थांबणार असल्याने शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

शासकीय खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीशी संपर्क करून, रीतसर टोकन घेऊनच कापसाचे वाहन जिनिंगला घेऊन जावेत. 
संभाजी शेजूळ, सभापती. 

संपादन-प्रताप अवचार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Purchase white gold started in Majalgaon