बीड जिल्ह्यात १६५ जण क्वारंटाइन; विलगीकरण कक्षात आठजण 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

बीड जिल्ह्यात पिंपळा (ता. आष्टी) येथे कोरोना विषाणूचा रुग्ण आढळला असला तरी त्याची तपासणी व उपचार नगर जिल्हा रुग्णालयात सुरू आहेत. 
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात परदेशातून ११८ जण आले होते. ते सर्वच सध्या होम क्वारंटाइनमधून बाहेर आले आहेत. 

बीड - जिल्ह्यात आजघडीला एकही कोरोना रुग्ण नसला तरी होम क्वारंटाइन आणि इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन केलेल्यांची संख्या १६५ आहे. तर, आठजण विलगीकरण कक्षात आहेत. यात अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात सहा तर बीडच्या जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दोघेजण आहेत.

दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातून १४१ स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. यातील १३७ स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आहेत. 

जिल्ह्यात पिंपळा (ता. आष्टी) येथे कोरोना विषाणूचा रुग्ण आढळला असला तरी त्याची तपासणी व उपचार नगर जिल्हा रुग्णालयात सुरू आहेत. 

औरंगाबादेतील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात परदेशातून ११८ जण आले होते. ते सर्वच सध्या होम क्वारंटाइनमधून बाहेर आले आहेत. तर, जिल्ह्यातीलच मात्र बाहेर जिल्ह्यातून आलेले ५५ जर होम क्वारंटाइन आहेत तर संस्थात्मक अलगीकरण केलेल्यांची संख्या ११० आहे.

दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातून कोरोना तपासणीसाठी १४१ स्वॅब पाठविण्यात आले. यातील १३४ स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व निगेटिव्ह आहेत. 

बाजेवर टाकून आणले मायलेकीचे मृतदेह  

कोरोना रुग्ण आढळलेल्या पिंपळासह धनगरवाडी, काकडवाडी, खरडगव्हाण, सुमबेवाडी, नांदूर, लोणी, कोयाळ, कुंटेफळ (पु.), सोलापूरवाडी, ठोंबळ सांगवी या गावांत मागील सात दिवसांपासून सर्वेक्षण सुरू आहे. २६२० घरांचा सर्व्हे करून १२३४५ व्यक्तींची तपासणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Quarantine 165 people in Beed district