esakal | अतिवृष्टीनंतर रब्बी हंगामातील पिकांचे गणित कोडमडले!
sakal

बोलून बातमी शोधा

रब्बी पीक.jpg

उमरगा (उस्मानाबाद) : ज्वारी पेरणी अत्यल्प, हरभरा गव्हाचे क्षेत्र वाढले ;  तुरीवर अळ्यांचे संकट !  

अतिवृष्टीनंतर रब्बी हंगामातील पिकांचे गणित कोडमडले!

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद) : परतीचा पाऊस त्यात पुन्हा अतिवृष्टी झाल्याने रब्बी पेरणीला विलंब होत गेल्याने यंदा रब्बी पिकाचे गणित कोलमडले आहे. तण वाढलेल्या रानाची मशागत करून पेरणीची तयारी, भिजलेल्या सोयाबीनची रास करण्यासाठी करावे लागलेले प्रयत्न आणि तुरीवर पडलेल्या अळ्यांचा प्रार्दुभाव नष्ट करण्यासाठी औषध फवारणीचे काम ही सर्व कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

दरम्यान यंदा पाण्याची उपलब्धता असल्याने रब्बी हंगाम चांगला जाईल असे भाकित व्यक्त केले जात असले तरी विलंबाने होणाऱ्या पेरण्यामुळे उत्पन्नात मोठी घट होईल असे वाटते. 

तालुक्यात खरीप हंगामातील पेरणी क्षेत्र सर्वाधिक असते. अवेळी झालेल्या पावसामुळे उत्पन्नात फारसी वाढ होऊ शकली नव्हती. जेमतेम निघालेल्या उडीद, मुगाला चांगला मिळाला. सोयाबीनचे मात्र मोठे नुकसान झाले. दरम्यान ऐन पेरणीच्या तोंडावर मोठा पाऊस झाल्याने शेतातील वाढलेले तण काढण्यासाठी शेतकऱ्यांना पूरेसा अवधी मिळाला नाही. त्यात भिजलेल्या सोयाबीनच्या राशीने शेतकऱ्यांना बुचकाळ्यात टाकले.  पावसाने खंड दिल्यानंतर  सोयाबीनच्या गंजी खुल्या करुन उन्हाचा मारा देऊन राशी केल्या गेल्या. दुसरीकडे रब्बीच्या पेरणीला विलंब झाल्याने पेरणीचे कामे आटोपून घेण्याची कसरत करावी लागली, अजूनही कांही ठिकाणी पेरणीची तयारी सुरू आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तुरीवर केली जातेय औषध फवारणी

खरीप हंगामातील तुर पेरणीचे क्षेत्र कमी होत आहे. शेतकऱ्यांचा भर सोयाबीनवर वाढला आहे. साधारणतः पंधरा ते सोळा हजार हेक्टर क्षेत्रावर तुर पिक आहे. परतीचा पाऊस अधिक झाल्याने कांही क्षेत्रात तुर पीकाला धोका झाला तर बऱ्याच ठिकाणी तूर बहरात आहे. अधून -मधून होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे फुलस्थितीत असलेल्या तुरीवर अळ्यांचा मारा होत आहे. शिवाय फळधारणेच्या स्थितीतही अळ्याचा मारा होत आहे. अळ्या, किटकांचा प्रार्दूभाव वाढत असल्याने नकांही ठिकाणी औषध फवारणीचे कामे शेतकऱ्यांनी सुरु केली आहे. दरम्यान अळ्याचे प्रमाण हळूहळू वाढण्याची शक्यता असल्याने महागडया औषधांची खरेदी आणि फवारणीसाठी लागणाया मजुरीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक जुळवाजुळव करावी लागत आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

हरभरा, गव्हाच्या पेरणीला प्राधान्य

तालुक्यात रब्बीचे ४५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर मोठा पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पेरणीसाठी रानात वापसा येण्यास विलंब झाल्याने पेरण्याही उशीरा सुरू झाल्या. शेतातील तण काढण्यासाठी तणनाशकाची फवारणी करावी लागली शिवाय रोटरॉक्टरचा पर्याय करावा लागला. ज्वारीच्या पेरणीचा कालावधी शेवटच्या टप्प्यात असल्याने त्याचे क्षेत्र कमी झाले आहे. हरभरा, गव्हाचे क्षेत्र मात्र वाढले आहे. जवळपास ७५ टक्के पेरण्या झाल्याची कृषी विभागाची माहिती आहे अजूनही पेरण्या सुरू आहेत. दरम्यान यंदा पाण्याची उपलब्धता असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड करताहेत.


यंदाच्या खरिप हंगामातील पिकाचे उत्पन्न घटले, अतिवृष्टीने रब्बीच्या पेरणीला विलंब झाला. तूर पिकावर आता अळ्याचे विघ्न सुरू झाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ होत आहे. शिवारातील पिकाची जोपासना करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र ऐनवेळी निसर्गाच्या दृष्टचक्रात पिकाचे नुकसान होते आणि शेतकऱ्यांची आर्थिक, शारीरिक मेहनत वाया जाते. -संजय इंगळे, शेतकरी

(संपादन-प्रताप अवचार)

loading image
go to top