राज्यातील गॅस एजन्सीवर पडणार धाडी

हरी तुगावकर
सोमवार, 10 डिसेंबर 2018

लातूर : राज्यात घरगुती गॅसचा मोठ्या प्रमाणावर अवैध वापर होत आहे. हे लक्षात आल्यानंतर आता राज्यभरातील गॅस एजन्सीवर धाडी टाकण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. दर सहा महिन्याला अचानक या धाडी टाकून गॅस एजन्सीची तपासणी केली जाणार आहे. यात अवैध वापर केल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल केले जाणार आहेत. राज्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या तपासणी किंवा धाडी टाकल्या जाणार आहेत.

केरोसीन सारखी तपासणी
राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचा अपहार किंवा गैरवापर होवू नये म्हणून रास्तभाव दुकाने व केरोसिन परवानाधारक यांच्यावर सातत्याने तपासणी करणे किंवा धाडी टाकल्या जात आहेत. पण आतापर्यंत राज्यात एकाही गॅस एजन्सीवर शासकीय अधिकारी मात्र धाडी टाकत नव्हते किंवा त्यांची तपासणीही करीत नव्हते.

सहा महिन्याला तपासणी
घरगुती गॅसचा अवैध वापर होत असल्याचे आता शासनाच्या लक्षात आले आहे. यात गॅस एजन्सीतूनच हे प्रकार सुरु आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी केरोसिन व रास्तभाव दुकान परवान्याच्या तपासण्या करताना शिधावाटप क्षेत्रातील प्रत्येक गॅस एजन्सीची सहा महिन्यातून किमान एकदा तपासणी करावी तसेच अचानक धाडी टाकाव्यात असे आदेश आता शासनाने दिले आहेत.

गुन्हे दाखल होणार
एखाद्या गॅस एजन्सीमध्ये अवैध प्रकार आढळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यात जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ व लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस (रेस्ट्रिक्शन आॅफ युज अॅण्ड फिक्सेशन आॅफ सेलिंग प्राईस) अॉर्डर, २००० नुसार संबंधीतावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

अधिकाऱय़ावर शिस्तभंगाची कारवाई
या तपासण्या करताना क्षेत्रिय अधिकाऱय़ांना नियमित तपासणीचे दरमहा इष्टांक दिला जाणार आहे. घरगुती गॅस एजन्सीच्या व गॅसच्या अवैध वापराबाबत विहित मानांकाप्रमाणे तपासणी न करणाऱया अधिकाऱय़ावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱय़ांना देण्यात आले आहेत. याची कडक अंमलबजावणी झाली तरच अवैध गॅस वापरावर आळा बसणार आहे.

Web Title: raid on gas agency in the state

टॅग्स