कोरोना विरोधात लढण्यात रेल्वे विभाग सक्रिय 

file photo
file photo

नांदेड : सर्व देशावर कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे संकट ओढवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केल्यानुसार संपूर्ण देशात लॉक डाऊन सुरु आहे. सर्व प्रवासी रेल्वे सेवा ता. १४ एप्रिलपर्यंत देशभर बंद आहेत. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी रेल्वे विभागसुद्धा सक्रीय झाला आहे. 

परंतु त्याच वेळेस अत्यावश्यक वस्तू, अन्नधान्य, खते -बियाणे, कोळसा, भाजीपाला, दूध इत्यादी जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तू घेऊन भारतीय रेल्वेमध्ये माल वाहतूक सेवा सुरु आहे. याकरीता  सर्व रेल्वे स्थानकावरील आणि नियंत्रण कार्यालयातील कामकाज सुरळीतपणे सुरु ठेवण्याकरिता रेल्वे प्रशासन प्रयत्न करत आहे. 

रेल्वे स्थानकावरील कंत्राटी- रोजंदारी कार्य करणाऱ्यांना अन्नधान्य वाटप

कोरोना विषाणूचा संसर्ग सेवेवर कार्यरत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना होऊ नये म्हणून विभागीय रेल्वे प्रशासन विविध प्रयत्न करत आहे. तसेच प्रवासी रेल्वे सेवा बंद असल्यामुळे विविध रेल्वे स्थानकावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना काही अंशी आर्थिक अडचण येत असेल या भावनेतून विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपेंदर सिंग यांच्या प्रयत्नातून नांदेड विभागातील विविध रेल्वे स्थानकावरील कंत्राटी - रोजंदारी कार्य करणाऱ्यांना अन्नधान्य इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. 

नांदेड विभागीय रेल्वे दवाखान्यात स्वतःच सॅनिटायजर्स बनविले

तसेच मागणी अधिक असल्यामुळे सॅनिटायजर्स मार्केटमध्ये उपलब्ध नाहीत. यावर उपाय म्हणून नांदेड रेल्वे डॉक्टरांनी नांदेड विभागीय रेल्वे दवाखान्यात स्वतःच सॅनिटायजर्स बनविले आणि नांदेड विभागातील विविध रेल्वे स्थानकावरील कर्मचार्यांपर्यंत पोहोचविले. याकामी रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) अधिकारी आणि कर्मचारी यांनी रेल्वे डॉक्टरांना सहकार्य केले. 

रेल्वे कर्मचाऱ्यांचा परिवार त्यांच्यासाठी मास्क बनवत आहेत

तसेच मार्केटमध्ये मास्कचा पण तुटवडा जाणवत आहे.  यामुळे नांदेड रेल्वे कर्मचाऱ्यांचा परिवार त्यांच्या साठी मास्क बनवत आहेत. या मास्कचा वापर नांदेड रेल्वे विभागातील विविध कर्मचारी करत आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांचे कुटुंब ही जबाबदारी पार पाडत असल्यामुळे उपेंदर सिंग यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com