जालना जिल्ह्यात पावसाची रिपरिप : पहा video

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 June 2020

जिल्ह्यात मंगळवारी (ता.दोन) सायंकाळी मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. परिणामी बुधवारी (ता.३) सकाळी आठ वाजेपर्यंत १०.४४ मिली मीटर पावसाची नोंदणी झाली आहे.  बुधवारी (ता.३) सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने दुपारी शहरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. 

जालना - शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (ता.दोन) सायंकाळी मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. परिणामी बुधवारी (ता.३) सकाळी आठ वाजेपर्यंत १०.४४ मिली मीटर पावसाची नोंदणी झाली आहे.  बुधवारी (ता.३) सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने दुपारी शहरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. 

जून महिना सुरू झाला की शेतकऱ्यांना पावसाची आस लागते गतवर्षी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावला नाही. दरम्यान ता.एक जूनपासून जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. या तीन दिवसात जिल्ह्यात २३.५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा : अख्खा जेसीबीच विहिरीत गुडूप

दरम्यान मंगळवारी जिल्ह्यातील आठही तालुक्यात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली बुधवारी (ता.तीन) सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात १०.४४ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. जालना तालुक्यात सर्वाधिक १७.६३ मिलिमीटर, बदनापूर तालुक्यात ७.८० मिलिमीटर, भोकरदन तालुक्यात १.८० मिलिमीटर, जाफराबाद तालुक्यात ४.८० मिलिमीटर, परतूर तालुक्यात ११मिलिमीटर, मंठा तालुक्यात १३.५० मिलिमीटर, अंबड तालुक्यात ९.१४ मिलिमीटर तर घनसावंगी तालुक्यात १८.२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार

दरम्यान, बुधवारी सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शहरात मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळण्यास सुरवात झाली. पावसाचा जोर कमी अधिक होत होता. सलग तिसऱ्या दिवसी पावसाने शहरात हजेरी लावली आहे.
दरम्यान जून महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीपपूर्व कामे आधीच पूर्ण केले असून पेरणी योग्य पावसाची शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत. दरम्यान, टेंभुर्णी परिसरात बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सकाळी भुरभुर पावसानंतर दुपारी एक वाजता पावसाने जोर  धरला.पावसामुळे गावात ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले.पिककर्जासाठी बाहेरून आलेल्या शेतकऱ्यांची पावसामुळे दैना झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain in Jalna district

Tags
टॉपिकस
Topic Tags: