esakal | धामनाच्या सांडव्यावरून झुळझुळ पाणी 
sakal

बोलून बातमी शोधा

शेलूद (ता. भोकरदन) : येथील धामना प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. सांडव्यावरून वाहणारे पाणी.

जोरदार पाऊस झाल्यामुळे शेलूद (ता. भोकरदन) येथील धामना प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे परिसरातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

धामनाच्या सांडव्यावरून झुळझुळ पाणी 

sakal_logo
By
कैलास दांडगे

पारध (जि.जालना) -  परिसरात मंगळवारी (ता. १४) जोरदार पाऊस झाल्यामुळे शेलूद (ता. भोकरदन) येथील धामना प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे परिसरातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. दरम्यान, पारधसह प्रकल्पाखालील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 

जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातील धामना धरण परिसरातील वडोद तांगडा, धावडा, शिवना भागात सोमवारी (ता. १३) रात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धामना प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी भर पडली. प्रकल्प आता शंभर टक्के भरल्यामुळे मंगळवारी (ता. १४) सांडव्यावरून पाणी पडण्यास सुरवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.

हेही वाचा : पावसाचं पाणी, आबादानी...

धामना प्रकल्पातून अनेक गावांत पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे आता या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पावसामुळे पारध येथील रायघोळ नदीलादेखील पूर आला. 

हेही वाचा : दिवस येतील छान, घेऊ नका ताण

गेल्यावर्षी याच महिन्यात धामना प्रकल्प तुडुंब भरला होता; मात्र सांडव्याला गळती लागल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. परिसरातील अनेक गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला होता. तर प्रशासनाच्या वतीने प्रकल्पावर जवानांचा पहारा ठेवण्यात आला होता. यंदाही प्रशासनाला दक्ष राहावे लागणार असल्याचे चित्र आहे. धामना प्रकल्प रायघोळ नदीवर आहे. प्रकल्प भरला की पारध परिसरात अनेक गावांत पाणी घुसते. गेल्यावर्षी पारध येथील गणेशवाडी भागात पाणी घुसले होते. त्यामुळे अनेक गावांना दक्षतेचा इशारा संबंधित विभागाकडून देण्यात आला आहे. 

(संपादन : संजय कुलकर्णी)

loading image