esakal | पावसाचं पाणी, आबादानी 
sakal

बोलून बातमी शोधा

वालसावंगी : जाळीचा देव परिसरातील हिरवाईने नटलेला डोंगर. 

डोंगराळ भागात यंदा पावसाची सातत्यपूर्ण हजेरी लागत आहे. परिणामी धरणीने हिरवा शालू परिधान केला आहे. डोळ्याचे पारणे फिटेल असा हा भाग सध्या दिसत आहे. 

पावसाचं पाणी, आबादानी 

sakal_logo
By
विशाल अस्वार

वालसावंगी (जि.जालना) - डोंगराळ भागात यंदा पावसाची सातत्यपूर्ण हजेरी लागत आहे. परिणामी धरणीने हिरवा शालू परिधान केला आहे. डोळ्याचे पारणे फिटेल असा हा भाग सध्या दिसत आहे. 

भोकरदन तालुक्यातील वालसावंगीजवळील कालिंकामाता परिसर व जाळीचादेव हा मोठा डोंगराळ भाग आहे. पावसाळा सुरू असल्याने त्यात या भागात पाऊस पडत असल्याने हा भाग नयनरम्य झाला आहे, पावसामुळे येथील विविध प्रकारची झाडे-झुडपे बहरली आहेत. डोंगराळ भागातील छोटे-मोठे धबधबे वाहत आहेत. तलावात पाणी साचले आहे. सगळीकडे हिरवळ पसरली आहे. हिरवाईवर चरणारे पशू, भोवती पक्ष्यांचा चिवचिवाट असे हे दृश्य नक्कीच सुखावणारे आहे. 

हेही वाचा : जुईत पाऊस थुईथुई... 

डोंगराच्या कुशीत असलेले कालिंकामाता मंदिर सभोवतालचा परिसर, डोंगराच्या उंच टेकडीवर असलेले आणि भोवती खोल दऱ्या असलेले जाळीचादेव मंदिर परिसरसुद्धा लक्ष वेधून घेणारा बनला आहे. दरवर्षी येथे आसपासच्या परिसरातून हजारो पर्यटक येत असतात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परिसरात शुकशुकाट दिसत आहे. 

हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार

डोंगराळ भागाप्रमाणे शेतशिवारात देखील हिरवेगार बनले आहे. सध्या परिसरातच हिरवाईचे नयनरम्य दृश्य बघायला मिळत आहेत. खरीप पिके आता बहारदार अवस्थेत आहेत. त्यामुळे निसर्गसौंदर्यात भरच पडलेली आहे. 

(संपादन : संजय कुलकर्णी)

loading image