कांद्याच्या पिकाला परतीच्या पावसाचा फटका

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 November 2019

सुरवातीला कांद्याला सात हजार रुपये क्विंटल भाव मिळाला; मात्र आता कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे भाव कमी होण्याची भीती कांदा उत्पादकांना भेडसावत आहे. 

परंडा (जि.उस्मानाबाद) : परतीच्या पावसाचा फटका कांद्याच्या पिकाला बसल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याचे भाव घसरत असताना शुक्रवारी (ता.29) दुपारनंतर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल सात हजार रुपयांचा भाव मिळाला. 

शेतकऱ्यांना कांदा पिकाने रडवले 
हंगामाच्या सुरवातीला कांद्याला सात हजार रुपये क्विंटल भाव मिळाला. मात्र आता कांद्याची आवक वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव कमी होण्याची भीती कांदा उत्पादकांना वाटू लागली आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून कांद्याचे भाव कमी झाले होते. एक हजार ते साडेपाच हजार रुपयांचा भाव कांद्याला मिळाला होता. मात्र उताऱ्यात झाल्याने शेतकऱ्यांना कांदा पिकाने रडवले आहे. 

बीडमधून धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके की संदीप क्षीरसागर?

जाणून घ्या - मेंदू न उघडता ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया

कांद्याची आवक वाढली 
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. सध्या चांगल्या प्रतीच्या कांद्याला सात हजार रुपये क्‍विंटलप्रमाणे भाव मिळत आहे. तर मध्यम स्वरूपाच्या कांद्याला तीन ते पाच हजार रुपये क्विंटलचा भाव मिळत आहे. आवक वाढल्यास भाव कमी होण्याची शक्‍यता आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यासह सोलापूर, नगर, पुणे, बीड जिल्ह्यांच्या काही भागांतील शेतकरी कांदा विक्रीसाठी घेऊन येत आहेत. 

परतीच्या पावसाचा फटका बसल्याने कांदा जमिनीतच नासून गेला. सततच्या भिजपावसाने शेतकऱ्यांना कांदा काढणीस वेळ मिळाला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कांद्याला भाव येत असला तरी म्हणावा असा उतारा मिळत नाही. बाजारपेठेतील उलाढालीचा परिणाम कांद्याच्या भावावर होत आहे. चांगल्या कांद्याला आज सात हजार रुपये भाव मिळाला. सद्य:स्थितीला कांद्याने सत्तरी गाठली; मात्र आगामी काळात कांद्यांचे भाव वाढतील. 
- रवी वाघमोडे, व्यापारी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rainfall hits onion crope