Video : तहसील कार्यालय गेलं पाण्यात, कुठं घडला हा प्रकार !    

अविनाश काळे 
Saturday, 19 September 2020

उमरगा तहसील कार्यालयाचा तळमजल्यात पाणीच पाणी झाले आहे. पुरवठा, निवडणूक, अभिलेख व संजय गांधी निराधार योजना विभाग पुर्णपणे पाण्याखाली गेला आहे. 

उमरगा (उस्मानाबाद) : तीन वर्षापूर्वीच नव्याने बांधलेल्या तहसील कार्यालयाच्या तळमजल्यातील पाण्याचे झरे कांही केल्या बंद होत नाहीत. तीन पावसाळा ऋतूमध्ये तळमजल्यात पाणी साचण्याचे प्रकार होऊनही प्रशासनाकडून बेदखल होत आहे, त्यावर पर्यायी उपाययोजनाही केल्या जात नाहीत. दरम्यान गेल्या दोन दिवसापासुन तळमजल्यात पाणी साचल्याने पाच विभागाचे काम ठप्प आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
शहराच्या वैभवात भर टाकण्यासाठी तहसील कार्यालयाची इमारत झालेली नाही.

इमारतीची जागा राष्ट्रीय महामार्गापासुन बरीच लांब असल्याने कार्यालयाला जाण्यासाठी चिखलातुन जावे लागते. अतिवृष्टी व दमदार पाऊस झाल्यानंतर इमारतीच्या तळमजल्यात पाणी साचण्याचा प्रकार वारंवार घडतो आहे. त्यावर पर्यायी उपाययोजना करण्यासाठी महसूल विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मात्र त्यावर कांहीही तोडगा निघत नाही. गेल्या तीन -चार दिवसापासुन मोठा पाऊस होत आहे  त्यामुळे पाण्याचा झिरपा कांही केल्या कमी होत नाही. दरवर्षीची स्थिती पाहून सेतू सुविधा केंद्र भाड्याच्या ठिकाणी कार्यरत आहे तर सध्या संजय गांधी निराधार योजना, रेकॉर्ड (अभिलेख) विभाग, पुरवठा विभाग व निवडणूक विभागाचे काम ठप्प आहे.  दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे गरिबांना अन्न -धान्याचे वाटप करणाऱ्या पुरवठा विभागाच्या यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना पाण्यातुन वावर करत कामकाज करावे लागत आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(Edit-Pratap Awachar)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rainfall news tehsil office into water