esakal | कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करा- पोलिस अधिक्षक रोशन
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad

गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. आठ) चिंचोळे मंगल कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत रोशन बोलत होते

कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करा- पोलिस अधिक्षक रोशन

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद): कोरोनाची पार्श्वभूमी अजून संपलेली नाही. राज्य सरकारने गणेश उत्सव साजरा करण्याची संधी दिली आहे मात्र सर्व गणेश मंडळांनी पोलिस खात्याच्या नियमावलीनुसार उत्सव करावा. गणेशोत्सवात कोरोनाचा संसर्ग पसरू नये याची खबरदारी प्रत्येकांनी घेतली पाहिजे. सामाजिक प्रबोधन, उपक्रम छोटेखानी घेऊन उत्सवाची परंपरा जपावी असे आवाहन पोलिस अधिक्षक राज तिलक रोशन यांनी केले. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. आठ) चिंचोळे मंगल कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत रोशन बोलत होते. नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे अध्यक्षस्थानी होत्या. उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, प्रभारी तहसीलदार एन. आर. मल्लूरवार, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रणधीर पवार व्यासपीठावर उपस्थित होते.

रोशन पुढे म्हणाले की, गणेश मंडळांनी एक गाव एक गणपतीची परंपरा जपत रक्तदान, सामाजिक उपक्रम राबवावेत. गणेशाच्या स्वागताची अथवा विसर्जनाची मिरवणूक काढता येणार नाही. सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्ती चार फुटापेक्षा अधिक उंचीच्या तर घरगुती मूर्ती दोन फुटापेक्षा उंच नसाव्यात. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले यांनी गणेश मंडळांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

हेही वाचा: फेसबुक, ट्विटरवरील कमेंट्स डिलीट करून या! PMO चा फोन अन् मंत्रीपद...

या वेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव दिलीप भालेराव, व्यापारी महासंघाचे मार्गदर्शक सिद्रामप्पा चिंचोळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, गणराज गणेश मंडळाचे मार्गदर्शक जगदिश सुरवसे, नगरसेवक अतिक मुन्शी, सुधाकर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला पालिकेचे कार्यालयीन अधिक्षक तुळशीदास वऱ्हाडे, व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष नितीन होळे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस माधव पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रशेखर पवार, संदिप चौगुले, युवा सेनेचे सचिन जाधव, योगेश तपसाळे, मुस्लिम जमात कमिटीचे बाबा औटी, याकुब लदाफ, कलीम पठाण, अलिम विजापुरे, निजाम व्हंताळे, नगरसेवक बालाजी पाटील, रिपाईचे तालुकाध्यक्ष सुभाष सोनकांबळे, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राम गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांच्यासह शहर व तालुक्यातील विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रविण स्वामी यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले.

हेही वाचा: लोअर दूधनाचे सोळा दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

उत्सव पुन्हा येतील .. पण

गणेशत्सवाची परंपरा मोठी असते मात्र कोरोनामुळे सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, उत्सवाची संधी मिळालेली असली तरी त्याला नियमांचे बंधन पाळलेच पाहिजे. उत्सव पुन्हा येतील पण जीवाभावाचा माणूस जगला पाहिजे, त्यासाठी सर्वांनी कोरोनाचे नियम पाळावेत असे आवाहन पोलिस निरीक्षक मुकुंद अघाव यांनी प्रास्ताविकात केले.

loading image
go to top