esakal | अत्याचार करुन पिडीतेला मागितली खंडणी
sakal

बोलून बातमी शोधा

crime news 1.jpg

परळीतील धक्कादायक प्रकार : दोघांविरुद्ध गुन्हा

अत्याचार करुन पिडीतेला मागितली खंडणी

sakal_logo
By
प्रा. प्रविण फुटके

परळी (बीड) : धमकी देत तीन वर्षांपासून अत्याचार करुन पिडीतेचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढले. त्यानंतर पीडितेला ब्लॅकमेल करुन ७० हजार रुपयांची खंडणी मागितली. हा धक्कादायक प्रकार येथे बुधवारी (ता.२८) रात्री उशिरा उघडकीस आला. या प्रकरणी दोघांवर अत्याचार व खंडणीचा गुन्हा नोंद झाला.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

पोलिसांच्या माहितीनुसार, परळी शहरातील भोई गल्लीतील तीस वर्षीय पीडितेवर जानेवारी २०१८ पासून गल्लीतीलच अमर पवार हा धमकी देऊन घरात घुसून अत्याचार करत असे. भीतीपोटी तिने हा अत्याचार नाईलाजाने सहन केला. दरम्यान, त्याने आपल्या मोबाइलमध्ये तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ तयार केले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आरोपीने हे फोटो व व्हिडीओ एका व्यक्तीला पाठविले. त्या व्यक्तीने २७ रोजी पीडितेला फोन करुन 'तुझे व अमरचे फोटो व व्हिडिओ तुझ्या नवऱ्याला दाखवीन' अशी धमकी दिली. शिवाय तुझ्या मुलांना जीवे मारण्याची धमकी देत ७० हजार रुपयांची खंडणी मागितली. अखेर पीडितेने शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरुन अमर पवार व अनोळखी व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)