चक्क पोलिसावरच बलात्काराचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

रुमवर भेटल्यावर त्याने लग्नाचे आमिष दाखवल्याने मैत्रीचे रुपांतर शारीरिक संबंधात झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी विशाल अंघोळ करुन निघून गेला...

औरंगाबाद : मुंबई मुख्यालयात पोलीस शिपाई असलेल्या कर्मचाऱ्यांने शहरात पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत असलेल्या 22 वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शाररिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, लग्नाला नकार दिल्याने फसवणुक झालेल्या मुलीच्या तक्रारीवरुन त्या पोलीसावर बलात्काराचा गुन्हा हर्सुल पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला.

मुलीने दिलेल्या तक्रारी नुसार, वर्षभरापूर्वी विशाल उर्फ भय्यासाहेब हरी औटे (रा. वडगाव जि. हिंगोली) या मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याशी शहरातील एका पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रात ट्रेनिंग घेत असलेल्या 22 वर्षीय मुलीची ओळख व्हाट्‌सऍपच्या माध्यमातून झाली. त्यावेळी तो दौंड येथे पोलीस ट्रेनिंगमध्ये होता. व्हाट्‌सऍपवरील मैत्रीतून एकटी किरायाच्या रुममध्ये राहणाऱ्या मैत्रीणीला भेटण्यासाठी 23 एप्रिल 2011 ला शहरात आला.

हेही वाचा - जालना जिल्ह्यात आढळताहेत दरवर्षी शंभरावर एड्सग्रस्त

रुमवर भेटल्यावर त्याने लग्नाचे आमिष दाखवल्याने मैत्रीचे रुपांतर शारीरिक संबंधात झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी विशाल अंघोळ करुन निघून गेला. त्यानंतर जुनमध्ये मुलगी त्याला दौंडला भेटायला गेली त्यावेळी त्याने तिथे लॉज करुन शाररीक संबंध प्रस्थापित केले.

बाप रे - शरीरसंबंधांतून होतात हे दहा आजार

दरम्यान तो ऑक्‍टोबर व नोव्हेंबर मध्ये दोन वेळा शहरात आला. त्यावेळी लॉजमध्ये भेटून शारीरिक संबंध ठेवले. त्यावेळी मुलीने त्याच्याकडे लग्नाचा आग्रह धरल्यावर त्याने टाळाटाळ सुरु केली. त्यानंतर वाद झाल्यावर त्याने त्याचे लग्न झाल्याचे सांगितले, असे मुलीच्या तक्रारीत म्हटले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर मुलीने प्रकार आई-वडीलांना सांगितल्यावर हर्सुल पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यावरुन विशाल औटे याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

क्लिक करा - एचआयव्हीबाधितांच्या पोटी प्रसवला आनंद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rape Charge Filed Against Police in Aurangabad