वासनांध तरुणाचा ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

बीड जिल्ह्यातील एक ऊसताेड मजूर दांपत्य ऊसताेडीसाठी कर्नाटक राज्यात गेलेले हाेते. गावाकडे सतरा वर्षांची मुलगी तिची बहीण व भावासोबत गावातच राहत होती. तिचा भाऊ आजोळी गेला असता तरुणाने या मुलीवर अत्याचार केला.

बीड - ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना तालुक्‍यात उघडकीस आली. या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पिंपळनेर ठाण्यात बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये शनिवारी (ता. सात) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. ज्ञानेश्‍वर मोमीन असे संशयित आरोपीचे नाव आहे.

पिंपळनेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी : तालुक्‍यातील एका गावात राहणाऱ्या 17 वर्षीय मुलीचे पालक महिन्यापूर्वी ऊसतोडीसाठी कर्नाटक राज्यात गेलेले आहेत. पीडित मुलगी, तिची बहीण व भाऊ असे तिघे गावात राहतात.

हेही वाचा - सेक्ससाठी तीन हजारांचा रेट, या शहरातील मॉल व्यवस्थापकासह एजंट, वारांगना अटकेत

पाच डिसेंबरला तिचा भाऊ आजोळी गेल्यानंतर ती घरकाम आटोपून कापूस वेचणीसाठी शेतात निघाली. त्या वेळी ज्ञानेश्‍वर मोमीन हा तरुण त्याच्या घरासमोर उभा होता. त्याने पीडितेला चुलत्याच्या घरात ओढून नेत तेथे अत्याचार केला. यानंतर तिच्या पोटात दुखू लागले.

ज्ञानेश्‍वर मोमीन याने त्याचा मित्र शंकर मोरे यास बोलावून त्याच्यासह तिला वडवणीच्या डॉक्‍टरकडे नेले. तेथील डॉक्‍टरांनी उपचारास नकार दिल्यानंतर बीडला आणून तिच्यावर उपचार केले. नंतर तिला घरी सोडून त्याने पोबारा केला. सहा डिसेंबरला मुलीच्या भावाने विचारल्यानंतर तिने सर्व प्रकार सांगितला. 

हेही वाचा - परभणी शहरातून बारा लाख रुपयांचे चोरीचे तांबे जप्त

दरम्यान, पीडित मुलीच्या आई-वडिलांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तेही तेथून परत आले. पीडितेच्या फिर्यादीवरून पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rape of a minor girl