पिंपळफाटा येथे धनगर समाजाचा रास्तारोको

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 October 2020

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने पिंपळफाटा (रेणापूर) येथे मंगळवारी (ता. २७) रस्ता रोको व ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. 

रेणापूर (जि. लातूर)  : धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने पिंपळफाटा (रेणापूर) येथे मंगळवारी (ता. २७) रस्ता रोको व ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

या बाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावी, मागील सरकारने धनगरांसाठी जाहीर केलेल्या आदिवासींच्या सवलती त्वरित लागू करून मंजूर केलेल्या १ हजार कोटींच्या निधींची तत्काळ तरतूद करावी, धनगर समाजातील मेंढपाळावर अलीकडे होत असलेल्या हल्ल्याचा पार्श्वभूमीवर मेंढपाळाच्या सुरक्षिततेसाठी कडक कायदे करून संरक्षण द्यावे यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आंदोलनात ॲड. मंचकराव डोने, अनिरुद्ध येचाळे, अनिल गोयकर, दिलीप गोटके, सुभाष सरवदे, विठ्ठल कस्पटे, रामदास माने, दत्ता सरवदे, के. आर. वाघमोडे, राजेंद्र सूळ, लक्ष्मण मारकड, राजन हाके, जगन्नाथ रवळे, शेषराव हाके, माधव राजे, दत्ता वाघमोडे, नवनाथ भोकरे, साधू व्यवहारे, अमित लोकरे यांच्यासह तालुक्यातील धनगर बांधव उपस्थित होते. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rastaroko Movement Dhangar Samaj at Pimpalphata Latur news