esakal | धान्य न उचलणाऱ्यांचे रेशन होणार बंद

बोलून बातमी शोधा

Osmanabad News

स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना अखेरचा रस्ता दाखविला जाणार आहे. सलग तीन महिने धान्य न घेतल्यास त्यांची गच्छंती केली जाणार आहे. 

धान्य न उचलणाऱ्यांचे रेशन होणार बंद
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद - स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना अखेरचा रस्ता दाखविला जाणार आहे. सलग तीन महिने धान्य न घेतल्यास त्यांची गच्छंती केली जाणार आहे. 

जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून गरीब आणि गरजूंना अल्पदराने धान्याचे वाटप केले जाते. प्रसंगी तेल, साखर असेही पदार्थ दिले जातात. जिल्ह्यात एकूण दोन लाख 93 हजार 394 शिधापत्रिकाधारकांना धान्य दिले जाते; मात्र यामध्ये काही शिधापत्रिकाधारक धान्य घेण्यास टाळाटाळ करतात.

वाचा - औरंगाबादची मोठी बातमी

सध्या सर्वत्र पॉस मशीनच्या माध्यमातून धान्याचे वितरण केले जाते. धान्य घेणाऱ्यांची तसेच न घेणाऱ्यांची नोंद प्रत्येक महिन्याला घेतली जाते. यामध्ये सातत्याने धान्य न घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांची संख्या वाढत आहे. त्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने याचा आढावा घेतला. यामध्ये गेल्या तीन महिन्यांत धान्य न घेणाऱ्यांची संख्या 10 टक्केपर्यंत असल्याचे दिसून आले आहे.

कर्क राशीच्या लोकांनी राहा सावध

त्यामुळे अशा सर्वच शिधापत्रिकाधारकांना धान्याच्या यादीतून डच्चू दिला जाणार आहे. दरम्यान, जेवढे शिधापत्रिकाधरकांना वगळले, तेवढ्याच संख्येच्या नवीन शिधापत्रिकाधारकांना यामध्ये समाविष्ट करता येणार आहे. अर्थात काहीजण गरजू नसल्याने, त्यांना धान्याची गरज नसल्याचे लक्षात येत असून त्याचनुसार त्यांना वगळले जाणार आहे. 

तालुक्‍यात सात हजार शिधापत्रिकाधारक वगळणार 

उस्मानाबाद तालुक्‍यातील 66 हजार शिधापत्रिकाधारकांना धान्य दिले जाते; मात्र यातील केवळ 59 हजार शिधापत्रिकाधारक धान्य उचलत असल्याचे लक्षात आले आहे. म्हणजेच तब्बल सात हजार कुटुंब धान्य उचलत नसल्याचे उघड होत आहे. या सर्वांचा दारिद्य्ररेषेवरील यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यांना धान्य देण्याच्या यादीतून वगळले जाणार आहे.

रेशन दुकानदारांची बैठक घेण्यात येणार आहे. यामध्ये धान्य न उचलणाऱ्यांची यादी घेण्यात येईल. त्यानुसार ती यादी ग्रामपंचायतीवर डकविली जाईल. त्यांना मुदत दिली जाणार आहे. त्यांनी यादी पाहून धान्य उचलण्यास सुरवात केल्यास त्यांना पुन्हा यादीत ठेवले जाणार आहे. अन्यथा त्यांचे नावे वगळली जाणार आहेत. 
- राजाराम केलुरकर, नायब तहसीलदार, उस्मानाबाद