घरचीचे कमी अन कामवालीचे वजन जास्त...कसे ते वाचा

File Photo
File Photo

नांदेड : एरवी दहा घरांचे काम करुन न थकणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलांना वेळेवर जेवायला देखील मिळत नाही. तरी त्यांच्या चेहऱ्यावर कधीच थकवा अथवा ताण - तणाव दिसून येत नाही. कारण त्यांनी दोन पैसे मिळतात म्हणून घरकामासाठी स्वतःला वाहुन घेतलेले असते. काम करणाऱ्या या महिलांच्या कधीच अंगाला अंग येत नाही. वरचेवर त्यांचे वजन कमी होत जाते. अंगातील रक्त कमी होते. तरी कधी वेळेवर रुग्णालयात जाण्यासाठी सुट्टी मिळत नाही. मात्र आज परिस्थिती खुप बदलली आहे. 

नाही म्हटले तरी, आज अनेक घरकाम करण्यासाठी एकतरी कामवालीबाई लागतेच. त्यामुळे तिच्याकडुन काम करुन घेणाऱ्या महिलांना घरातले एकही काम करावेसे वाटत नाही. त्यासाठी पैसे देखील मोजावे लागतात. मात्र त्याचे त्यांना काहीच वाटत नाही. अनेक घरात धुणी, भांडी, फर्शी, स्वंयपाक, बाळाला सांभाळण्यासाठी स्वतंत्र कामवाली बाई लागते. त्यामुळे ते घरातला इथला तांब्या तिथे उचलुन ठेवत नाहीत. परिणामी त्यांच्यातील फॅट वाढतो. लठ्ठपणा येतो. डॉक्टरांनी सांगुन देखील कुणी ऐकत नाही. एका व्यक्तीस उचलण्यासाठी दोन दोन माणसांची गरज लागते. 

कुठल्याही गोळ्या औषधा विना दोन ते तीन किलोनी वजन कमी​
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यापासून मात्र मरणाच्या भितीने अनेक मोठ्या घरात काम करणाऱ्या घरातील कामवाली बाईंचे काम बंद झाले आहे. अनेजन बाई तु काही दिवस तरी कामावर येऊ नकोस तुला पगार देतो. घरीच रहा असे म्हणत कामवाली बाई बंद केली आहे. नाईलाजाने कधीच धुणी भांडी न घासल्याने किंवा किचनमध्ये प्रवेश न केलेल्या महिलांना घरातील अनेक कामे स्वतः करावी लागत आहेत. परीणामी घरात राहुन वजन वाढलेल्या महिलांचे कुठल्याही गोळ्या औषधा विना दोन ते तीन किलोनी वजन कमी होण्सास सुरु झाले आहे. तर दुसरीकडे घरेलु कामावाल्या बाईच्या हाताला काम नसल्याने त्यांचे दोन ते तीन किलो वजन वाढले असल्याच्या पोस्ट सोशल मीडियातुन व्हायरल होत आहेत.  

थकलेल्या बायकोला चहा - शरबत करुन देण्याची वेळ
कोरोना विषाणुचा प्रसार टाळण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला. परिणामी, नोकरदार,मजुर असे सर्वचजण घरात बसून आहे. त्याचा परिणाम घरेलु कामगारांवरही झाला असून, घरमालकीनलाच आता घरातील सर्वप्रकारची कामे करावी लागत आहे. घरातील कामांची सवय नसल्याने अनेकींची नाकेनऊ येत असल्याचे चित्र उच्चभ्रू वसाहतींमधून बघायला मिळत आहे. थकलेल्या बायकोला चहा - शरबत करुन देण्याची वेळ नवरोबावर येत आहेत. तशा पोस्टही सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com