esakal | वास्तव : पाचशे बेडच्या वैद्यकीय महाविद्यालयात ‘कोरोना’साठी केवळ दोनच व्हेंटीलेटर
sakal

बोलून बातमी शोधा

वास्तव : पाचशे बेडच्या वैद्यकीय महाविद्यालयात ‘कोरोना’साठी केवळ दोनच व्हेंटीलेटर

कोरोना आजाराचे नाव ऐकले तरी, तीन वर्षाच्या लहान बालकापासून ते ज्येष्ठापर्यंत सर्वांना धडकी भरत आहे. जगभरात इतकी दहशत पसरवली आहे. या आजाराला हरवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने मिळुन २१ दिवसापर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. नांदेड जिल्ह्यात आत्तापर्यंत हजारो प्रवाशांचे टेंम्परेचर स्क्रिनिंग झाले. यातील ३२ संशयीतांचे ‘स्वॅब’ पुणे येथे पाठविली होती. परंतु सुदैवाने सर्वच्या सर्व अहवाल निगेटीव्ह प्राप्त आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 

वास्तव : पाचशे बेडच्या वैद्यकीय महाविद्यालयात ‘कोरोना’साठी केवळ दोनच व्हेंटीलेटर

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : कोरोनाशी लढा देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्नाखाली जिल्ह्यात आवश्‍यक त्या आरोग्य उपायोजना राबविल्या जात आहेत. यासाठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक शासकीय जिल्हा रुग्णालय व महापालिकेच्या आरोग्य विभाग सज्ज ठेवण्यात आले आहेत. मात्र या आजाराला हरवण्यासाठी निघालेल्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकुण व्हेंटीलेटर किती? या बद्दल नेमकी माहिती मिळत नाही. जवाबदार डॉक्टर देखील १२ तर कुणी १० व्हेंटीलेटर असल्याचे सांगत आहेत. 
 हेही वाचा- वाहतूक पोलिस कर्मचारी देणार ८१ दिवसांचे वेतन

पूर्व नियोजन कसे असायला हवे​
नांदेड शहरात यदा कदाचीत इस्लामपूर (सांगली) सारखी परिस्थिती जर उद्भवली तर, त्यासाठी नांदेडचे तिन्ही शासकीय रुग्णालयात कितपत सज्ज आहेत, हे तर काळच ठरवेल. परंतु त्यासाठी पूर्व नियोजन कसे असायला हवे या बद्दल कुणीच काही बोलत नाही. विष्णुपुरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या एकुण दहा वेंटीलेटर उपलब्ध असून, यातील दोन व्हेंटीलेटर हे कोरोना आयसोलेशन वार्डसाठी राखीव ठेवण्यात आले असल्याची माहिती देण्यात प्रशासनाकडून देण्यात आली. तर श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालयात पाच व्हेंटीलेटर उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हेही वाचलेच पाहिजे- खासगी रुग्णालय सुरु ठेवण्याचे आदेश

 वैद्यकीय महाविद्यालयातील अत्यावश्यक सेवा सुविधेचे काय?

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे रोज शहरातील श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात जाऊन आरोग्य यंत्रणेचा आढावा घेत आहेत. परंतु जिल्ह्यातील सर्वात मोठे पाचशे बेडचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या विष्णुपुरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे कुणीच फिरकत नाही. जो आढावा घेतला जातो तो केवळ शहरातील रुग्णालयांचा. त्यामुळे पाचशे बेडच्या वैद्यकीय महाविद्यालयातील अत्यावश्यक सेवा सुविधेचा कोण आढावा घेणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

कोरोनासाठी दोन व्हेंटीलेटर राखीव
सध्या एकुण सात व्यक्ती कोरंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहेत. यात निमोनिया झालेल्या दोन बालकांना समावेश आहे. तर महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थीनीस सर्दी झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तीला ॲडमीट करण्यात आले आहे. शुक्रवारी आढळुन आलेल्या चार संशयीत व्यक्तीस कोरंटाईन वार्डात ठेवण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. यातील काही व्यक्तींचे आहवाल अजून प्राप्त होणे बाकी आहे. कोरोनासाठी दोन व्हेंटीलेटर राखीव आहेत.
डॉ. संजय मोरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय